शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

डांबरी रोडच्या मजबुतीकरिता प्लास्टिकचा वापर

By admin | Updated: February 5, 2017 00:30 IST

डांबरी रोडच्या कामात डांबरासोबतच प्लास्टिकचाही वापर केल्यास रोडला मजबुती मिळते, हे प्रयोगातून सिद्ध झाले आहे.

प्रथमच बल्लारपूर नगर पालिकेने केला प्रयोग बल्लारपूर : डांबरी रोडच्या कामात डांबरासोबतच प्लास्टिकचाही वापर केल्यास रोडला मजबुती मिळते, हे प्रयोगातून सिद्ध झाले आहे. या कारणाने, बल्लारपूर नगर पालिकेने डांबरी रोडच्या कामात प्लॉस्टिकचा वापर करणे सुरू केले आहे. सध्या येथील विद्यानगर वार्डात ३६० मीटर लांबीच्या डांबरी रोडचे काम चालू आहे. त्यात आजवर १५०० किलो प्लॉस्टिक डांबरासोबत उपयोगात आणल्या गेले आहे. असा प्रयोग करणारी बल्लारपूर नगरपालिका विदर्भात पहिलीच आहे, असे सांगण्यात येते.ही संकल्पना चंद्रपूर रोटरी क्लबचे सदस्य डॉ.बालमुकूनद पालीवाल यांनी बल्लारपूर नगरपालिकेपुढे मांडली. त्यानुसार कचरा म्हणून जमा झालेल्या प्लॉस्टिकचे न.प.च्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील मशीनने प्लॉस्टिकचे थ्रेडींग (बारीक बारीक तुकडे) करण्यात येऊन त्यांना गिट्टीत मिसळण्यात आले व प्लास्टिक मिश्रीत गिट्टी व डांबरात एकजीव झाले. अशा त्रिमिश्रीत मसाल्याचा वापर रोड कामात नगर पालिका करीत आहे. याने रोड मजबूत होतो आणि त्याला दीर्घ आयुष्य लाभते, असे संबंधितांचे म्हणणे आहे. कचऱ्यात प्लॉस्टिकचे प्रमाण नेहमीच अधिक असते. त्या टाकाऊ प्लॉस्टिकचे व्यवस्थापन कसे करायचे, हा प्रश्न निर्माण होतो.डांबरी रोडच्या कामात प्लॉस्टिकचा वापर करता येतो, या प्रयोगामुळे प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्न काही अंशी सुटण्याला मार्ग मिळाला, असे न.प. चे मुख्याधिकारी विपीन मुद्धा हे लोकमतशी याबाबत माहिती देताना म्हणाले. हा प्रयोग प्रत्यक्ष कृतीत आणण्याकरिता नगरपालिकेचे नगर अभियंता संजय बोढे, सहायक अभियंता प्रशांत मून, अमृता नाईक, तांत्रीक सहायक किशोर संगीडवार, संजय पावडे, यांनी परिश्रम घेतले. याकामाकरिता नगराध्यक्ष हरिश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी यांनी साऱ्यांना प्रोत्साहित केले. टाकाऊ प्लॉस्टिकची या प्रयोगाने विल्हेवाट तर लागलीच, रोडच्या कामात डांबराचा खर्च ही कमी झाला आहे आणि रोडला प्लास्टिकमुळे मजबुती मिळत आहे, असा तिहेरी फायदा यामुळे होत आहे, हे येथे उल्लेखनीय! (तालुका प्रतिनिधी)