शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इरई (बोरगाव) रस्ता खडीकरणात वनखनिजांचा वापर

By admin | Updated: August 22, 2015 01:31 IST

तालुक्यातील इरईफाटा ते इरई (बोरगाव) या सुमारे चार चार किमी रस्त्याच्या खडीकरणात चक्क वन खनिजाचा सर्रास वापर सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.

८० ब्रासचे उत्खनन : कवठाळा, वनरक्षकाचा प्रतापकोरपना: तालुक्यातील इरईफाटा ते इरई (बोरगाव) या सुमारे चार चार किमी रस्त्याच्या खडीकरणात चक्क वन खनिजाचा सर्रास वापर सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या सदर रस्त्याच्या खडीकरणाचे काम चंद्रपूरच्या एका कंत्राटदाराने घेतले. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, अंदाजित २५ लक्ष रुपयाचे हे काम सदर कंत्राटदाराने ११ टक्के कमी (बिले) दरावर निविदेद्वारा प्राप्त केल्याचे समजते. दरम्यान, दोन महिन्यापासून हे काम सुरु आहे. या खडीकरणासाठी लागणारी ४० मि.मी. आकाराची गिट्टी आणि मुरूम या खनिजाची लगतच्या इरई (बोरगाव) येथील वनविभागाच्या कक्ष क्रमांक १९८ मधून खुलेआम अवैध उत्खनन केले जात आहे. ट्रॅक्टरद्वारा वाहतूक करुन सदर खनिज प्रस्तावित रस्त्याच्या कडेला ढिग करणे सुरु आहे. कवठाळा वनबिटाच्या वनरक्षकाशी कंत्राटदाराने कथितरित्या आर्थिक तडजोड करुन या उत्खननाचा सपाटा लावल्याची चर्चा आहे.दरम्यान, या खडीकरणाच्या कामात वापरण्यात येणारी सदर गिट्टी अत्यंत हलकी आणि निकृष्ट दर्जाची असल्याचे आढळून आले, तर मुरुमामध्येही मातीचे प्रमाण अधिक आहे. सध्या या रस्त्यावरील खड्डे याच मुरुमाने भरले असून या दोन दिवसाच्या पावसाने रस्त्यावर सर्वत्र चिखल झाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर सदर रस्त्याचे खडीकरण कुचकामी ठरणारे असले तरी कमिशनच्या लोभापाई गडचांदूरचे साबांवि अभियंते याकडे कमालिचे दुर्लक्ष करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. (तालुका प्रतिनिधी)