शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रेती उपसा करण्यासाठी चक्क स्वयंचलित बोटचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:26 IST

तालुक्यातील वर्धा नदीच्या मनगाव या गावाजवळील घाटातून चक्क स्वयंचलित बोटीवरील यंत्राद्वारे रेतीचा उपसा करीत असल्याची बाब उजेडात आली आहे.

ठळक मुद्देबोट महसूल विभागाच्या ताब्यात : नदीच्या डोहातून काढली जाते रेती

ऑनलाईन लोकमतभद्रावती : तालुक्यातील वर्धा नदीच्या मनगाव या गावाजवळील घाटातून चक्क स्वयंचलित बोटीवरील यंत्राद्वारे रेतीचा उपसा करीत असल्याची बाब उजेडात आली आहे. याची माहिती मिळताच तहसीलदार आणि त्यांच्या चमूने रविवारी तेथे धाड टाकून एक बोट जप्त केली आहे. नदीच्या पात्रातून अशा प्रकारे रेती काढण्याचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रकार असल्याचे सूत्राने सांगितले.रेतीला सोन्याचा भाव आला, तेव्हापासून वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करुन रेतीचा उपसा केला जात आहे. यात जेसीबी हे यंत्र अग्रेसर आहे. त्यात आता पुढले पाऊल म्हणून नदीच्या पात्रात स्वयंचलित बोटच उतरविण्यात आली आहे. या बोटीवरील यंत्राच्या माध्यमातून रेती उपसा केला जात आहे. या यंत्राने समुद्र खाडीतून रेती काढल्या जाते. परंतु नव्यानेच हे यंत्र याठिकाणी वापरण्यात आले. याद्वारे दिवसाकाठी १०० ते १२५ ब्रास रेती काढल्या जात होती. मनगावचे सरपंच विद्या उईके यांनी या रेती चोरीची तक्रार एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या प्रकाराची माहिती मनगाव येथील मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांना होती. परंतु त्यांचे या रेती तस्कराशी साटेलोट असल्याने त्यांनी ही बाब आपल्या वरिष्ठांना सांगितली नाही. गेल्या दीड महिन्यापासून या भागातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात होता. उपसा केलेल्या रेतीची किंमत आजच्या बाजारभावानुसार कोट्यवधीच्या घरात आहे. वापरण्यात आलेली शक्कल ही समुद्राच्या खाडीतून रेती काढण्याकरिता उपयोगात आणली जाते.परंतु जिल्ह्यात प्रथमच याप्रकारे नदीच्या डोहातून रेती काढण्याचा प्रकार सामोर आला आहे. तहसीलदार महेश शितोळे तसेच नायब तहसीलदार मधुकर काळे आणि त्यांच्या चमूने रविवारी टाकलेल्या धाडीत बोट जप्त करुन तहसील कार्यालयात आणली आहे. यासंदर्भात तहसीलदार शितोळे यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने भ्रमनध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.