सुभाष धोटे : बिबी येथे शुद्ध व थंड पाण्याच्या एटीएमचे लोकार्पण कोरपना : बिबी ग्राम आदर्श गावाकडे वाटचाल करीत आहे. सक्षम नेतृत्वच गावाचा विकास करू शकते. गावाच्या विकासासाठी सरपंच, उपसरपंच व इतर पुढाऱ्ययांमध्ये इच्छाशक्तीची गरज आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे सरचिटणीस सुभाष धोटे यांनी केले. ग्रामपंचायत बिबीच्या पेसा निधी अंतर्गत व अल्ट्राटेक सिमेंट कम्युनिटी वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने बिबी येथे शुद्ध व थंड पाण्याच्या एटीएमची सुविधा तसेच अल्ट्राटेक सिमेंट कम्युनिटी वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने बिबी येथील रामनगर कॉलनीत सिमेंट कॉंक्रीट रस्त्यांच्या भूमिपूजन कार्यक्रम सोमवारी पार पडला. सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे युनिट हेड जी. बाला सुब्रमण्यम यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे विविध विभागाचे कार्यकारी प्रमुख अनिल पिल्लई, लोहिया, तिवारी, सी. एस. आर. चे उपमहाव्यवस्थापक आशिष पासबोला, एल. अॅड टी. सिमेंट कामगार संघाचे कार्याध्यक्ष शिवचंद्र काळे, जि.प. सदस्या सरोज मुनोत, विकास प्रकल्प अधिकारी संजय पेठकर, साईनाथ बतकमवार, आनंदराव पावडे, सरपंच मंगलदास गेडाम, माजी सरपंच इंदिरा कोडापे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर आस्वले, माजी अध्यक्ष नामदेव ढवस, रामदास देरकर, कवडू पिंपळकर, ग्रा.पं. सदस्य नरेंद्र अल्ली, सुधा मोरे, संगीता ठाकरे, निवृत्ती ढवस व इतर मान्यवर उपस्थित होते. शुद्ध व थंड पाण्याच्या ए.टी.एम.चे प्रथम ग्राहक पुरुषोत्तम काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी केले. आभार ग्रामविकास अधिकारी अरुण वाकुडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देविदास मांदाडे, नीतेश मालेकर, सुनील कुरसंगे, अनिल आत्राम, संतोष झुरमुरे, आकाश कोडापे, सुनील जांभूळकर, लोकेश कोडापे, सुनील रासेकर, संजय मडकाम, दयाल आत्राम, चरणदास कोडापे, प्रेमराज झुरमुरे आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
गावाच्या विकासासाठी पुढाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीची गरज आवश्यक!
By admin | Updated: January 4, 2017 00:58 IST