शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावती नगर परिषदेतर्फे नगरविकास दिन साजरा

By admin | Updated: April 23, 2017 01:12 IST

भद्रावती नगर परिषदेतर्फे शुक्रवारी प्रथम नगर विकास दिन साजरा करण्यात आला. नगर विकास दिनाच्या

निबंध स्पर्धा : शिबिराचा १०० जणांना लाभ भद्रावती : भद्रावती नगर परिषदेतर्फे शुक्रवारी प्रथम नगर विकास दिन साजरा करण्यात आला. नगर विकास दिनाच्या निमित्ताने २० एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रथम नगर विकास दिनाचे उद्घाटक म्हणून प्रा. सचिन सरपटवार उपस्थित होते. तसेच न.प. मुख्याधिकारी विनोद जाधव व डॉ. कुंभारे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सफाई कर्मचारी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. जवळपास १०० सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी नगर विकास दिनाचे महत्त्व सांगून ३० एप्रिलपर्यंत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी प्रा. सरपटवार यांनीही मार्गदर्शन केले. तसेच आपले शहर कसे असावे, या विषयावर दोन गटात न.प. भद्रावतीतर्फे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम गट इयत्ता ५ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रथम बक्षीस ४ हजार रुपये, द्वितीय २ हजार रुपये व तृतीय बक्षीस १ हजार रुपये तसेच प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. द्वितीय गटात खुली स्पर्धा असणार असून प्रथम बक्षीस ५ हजार रुपये, द्वितीय ३ हजार रुपये व तृतीय बक्षीस २ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र राहणार आहे. इच्छूक स्पर्धकांनी आपले शहर कसे असावे, या विषयावर हस्ताक्षरात किंवा संगणकीकृत प्रतीमध्ये कमीत कमी ५०० शब्द निबंध लिहून २६ पर्यंत मोनिका डोके, न.प. भद्रावती यांच्याकडे जमा कराव्या, असे आवाहन मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)