शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीत अद्ययावत सांस्कृतिक सभागृह होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:01 IST

शैक्षणिक, सांस्कृतिक व नाट्यकलावंतांचे माहेरघर म्हणून ब्रह्मपुरीची ओळख आहे. मात्र सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी एकही सांस्कृतिक व नाट्य सभागृह या शहरात नव्हते.

ठळक मुद्देचार कोटींचा निधी मंजूर : विजय वडेट्टीवार यांचे प्रयत्न

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : शैक्षणिक, सांस्कृतिक व नाट्यकलावंतांचे माहेरघर म्हणून ब्रह्मपुरीची ओळख आहे. मात्र सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी एकही सांस्कृतिक व नाट्य सभागृह या शहरात नव्हते. त्यामुळे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पाठपुरावा करीत नगरविकास विभागाला वारंवार लेखी निवेदन देऊन चर्चा केली होती. तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही निवेदन दिले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून शहरात सर्वसोयीयुक्त असे वातानुकुलीत सांस्कृतिक व नाट्य सभागृहासाठी चार कोटींच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.सांस्कृतिक व नाट्य सभागृहाच्या बांधकामाकरिता नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत ब्रह्मपुरी नगर परिषदेला चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निर्णयामुळे ब्रह्मपुरी क्षेत्रातील विद्यार्थी, पालक व नाट्य रसिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सन १८७४ मध्ये ब्रह्मपुरी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. शैक्षणिक, सांस्कृतिक व नाट्यकलावंतांचे माहेरघर म्हणून मागील कित्येक दशकापासून प्रसिद्ध आहे. दरवर्षी शहरात अनेक सांस्कृतिक व नाटकांचे कार्यक्रम होतात. काही नाट्य कलावंतांनी आमदार विजय वडेट्टीवार यांना भेटून यासंदर्भात निवेदन दिले असता आमदार वडेट्टीवार यांनी दोन वर्षाच्या आत सांस्कृतिक व नाट्य सभागृहाचे बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदार वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, प्रधान सचिव नगरविकास मंत्रालय मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून विदर्भ वैधानिक मंडळास देण्यात आलेली जागा त्यांच्या उपयोगी नसल्यामुळे ती जागा सांस्कृतिक व नाट्य सभागृहाच्या बांधकामासाठी देण्यात यावे, आणि ती जागा नगर परिषदेला हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी केली होती. आता ती जागा नगर परिषदेला देल्याने सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.तारांकित प्रश्नातून वेधले होते लक्षजागेच्या पत्रासह आमदार वडेट्टीवार यांनी पुन्हा नगर विकास विभागाला लेखी निवेदन देवून सतत पाठपुरावा सुरू केला. विधानसभेत तारांकित प्रश्न, कपात सूचना सादर करून शासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून सांस्कृतिक व नाट्य सभागृहाच्या बांधकामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाला प्रशासकीय मंजुरीसुद्धा प्राप्त झाली आहे.