लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे जिवती तालुक्यातील टिटवी गावातील रिया मोतीराम मडावी या अडीच वर्ष वयाच्या मुलीचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच आमदार सुभाष धोटे यांनी ग्रामीण रुग्णालय, राजुरा येथे भेट देऊन मृतक रियाच्या पालकांची विचारपूस केली. त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर ताबडतोब त्यांना आर्थिक मदत केली. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालय सर्व सुविधांयुक्त व अद्ययावत करावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.बुधवारी रिया मडावी ही आजारी असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे सकाळी तिला भरती करून उपचार करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला गडचांदूर येथे रेफर करण्यात आले होते. पालकांनी राजुरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा रूग्णलय चंद्रपूर येथे डॉक्टरांनी रेफर केले. मात्र रुग्णवाहिका ताबडतोब उपलब्ध न झाल्यामुळे व प्रकृती अधिकच खालावल्याने चिमुकली रियाचा मृत्यू झाला होता.आमदार सुभाष धोटे यांनी या पार्श्वभूमीवर गुरुवारी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. कुळमेथे यांना या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या.उपसंचालक, आरोग्य सेवा नागपूर व जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर यांच्याशी संपर्क करून सर्व प्रकारच्या अडचणी दूर करून राजुरा येथे एका महिन्याच्या आत अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात यावे, त्यासाठी आवश्यक असणारा अधिकारी वर्ग व अन्य स्टाफ देण्यात यावा, रुग्णवाहिका सेवा अद्ययावत करण्यात यावी, येथे असलेल्या साधन सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा लवकरात लवकर करून परिसरातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात यावे, अशा सूचना केल्या.याप्रसंगी त्यांच्या सोबत नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, नगरसेवक हरजितसिंग संधू, साईनाथ बतकमवार, पाटण येथील वाघू उईके यासह अनेकांची उपस्थिती होती.
उपजिल्हा रुग्णालय अद्ययावत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST
बुधवारी रिया मडावी ही आजारी असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे सकाळी तिला भरती करून उपचार करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला गडचांदूर येथे रेफर करण्यात आले होते. पालकांनी राजुरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा रूग्णलय चंद्रपूर येथे डॉक्टरांनी रेफर केले.
उपजिल्हा रुग्णालय अद्ययावत करा
ठळक मुद्देसुभाष धोटेंच्या अधिकाऱ्यांना सूचना : रिया मडावी मृत्यूप्रकरणाची माहिती जाणून घेतली