शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा स्मारकाला अद्ययावत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:56 IST

जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणाऱ्या चंद्रपूरच्या हुतात्मा स्मारकाला लहान मुलांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत आवडीचे ठिकाण बनेल, अशा पद्धतीने नव्या स्वरूपात तयार करा, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : मनपा आयुक्तांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणाऱ्या चंद्रपूरच्या हुतात्मा स्मारकाला लहान मुलांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत आवडीचे ठिकाण बनेल, अशा पद्धतीने नव्या स्वरूपात तयार करा, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी हुतात्मा स्मारकाला भेट दिली. हुतात्मा स्मारकाचे स्वरूप बदलण्यासाठी नव्याने आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांना दिले. यावेळी महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे व अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते. महानगरपालिकेमार्फत संरक्षण भिंतीचे काम सध्या सुरू आहे. तथापि, केवळ संरक्षण भिंत व डागडुजी न करता या संपूर्ण परिसराचा विकास करण्यात यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील हुतात्मा झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे दीर्घकाळ टिकणारे छायाचित्र संरक्षक भिंतीवर उमटतील अशा पद्धतीचे नियोजन करावे, लहान मुलांपासून तर वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा सुविधा उपलब्ध कराव्या, लहान मुलांसाठी प्लेगार्ड, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कक्ष निर्माण करावे, महिला व पुरुषासाठी जॉगिंग ट्रॅक तयार करावे, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हुतात्मा स्मारक असल्याने दुपारच्या वेळेस या ठिकाणी तरुण मुला-मुलींना अभ्यास करण्यासाठी जागा उपलब्ध करावी, मुलांना या ठिकाणी इतिहासाचे दर्शन होतानाच करिअर करण्याची संधी उपलब्ध होईल अशी बैठक व्यवस्था करावी, अशा सूचनाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.