शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी कामगारांनी वाहिली अनोखी श्रध्दांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 00:53 IST

ताडाळी एमआयडीसी परिसरातील गोपानी आयरन अ‍ॅण्ड पॉवर कंपनीमध्ये काम करीत असलेल्या एका कामगाराचा राहत्या घरी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यू झाला.

मानवतेचे दर्शन : मृत कामगाराच्या कुटुंबाला ३१ हजारांची मदतघोडपेठ : ताडाळी एमआयडीसी परिसरातील गोपानी आयरन अ‍ॅण्ड पॉवर कंपनीमध्ये काम करीत असलेल्या एका कामगाराचा राहत्या घरी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या अकाली व अनपेक्षित निधनामुळे त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. ही बाब लक्षात घेऊन गोपानी कंपनीतील अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी मदत उभारून ३१ हजारांचा निधी जमविला. आपल्या सहृदयतेचा परिचय देणाऱ्या या कामगारांनी रविवारी हा निधी मृत कामगाराच्या कुटुंबाकडे सुपूर्द केला. महाकुर्ला येथील रहिवासी नागोराव भोयर हे मागील काही वर्षांपासून ताडाळी येथील गोपानी कंपनीमध्ये कार्यरत होते. १४ मेच्या सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घरी असताना अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखू लागले. कुटुंबीयांनी खाजगी गाडीची व्यवस्था केली. मात्र दवाखान्याच्या वाटेवरच तिव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. एका क्षणात सारे काही संपले होते. भोयर कुटूंबियांना आधार देणारा आधारवडच नियतीने हिरावून नेला होता. नागोराव भोयर यांच्या अवेळी जाण्याचे वृत्त समजताच कंपनीतील कामगार व अधिकारी यांनाही धक्काच बसला. मात्र, भोयर कुटुंबासाठी काही आर्थिक मदत करता येईल का, असा विचार कंपनीतील काही कामगार बांधवांनी बोलून दाखविला आणी कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी व कामगार बांधवांनी ही कल्पना आकाराला आणली. सर्वांनी यासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यातून ३१ हजार ५७० रुपयांचा निधी उभारला गेला.रविवारी नागोराव भोयर यांच्या तेरवीच्या कार्यक्रमाप्रसंगी ही आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. नागोराव भोयर हे कंपनीमध्ये त्यांच्या लाघवी स्वभावाने सर्वांना परिचित होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व मुलगी असा आप्तपरिवार आहे. भोयर यांच्या जाण्याने चांगला सहकारी हरविल्याची प्रतिक्रीया कामगारांतून उमटत आहे.(वार्ताहर)