शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

जिल्हाभर बेमुदत लेखणीबंद आंदोलन

By admin | Updated: February 10, 2016 00:51 IST

तलाठ्यांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप करीत विदर्भ पटवारी आणि मंडळ अधिकारी संघाच्या जिल्हा शाखेने ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात तलाठी प्रथमच रस्त्यावर चंद्रपूर : तलाठ्यांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप करीत विदर्भ पटवारी आणि मंडळ अधिकारी संघाच्या जिल्हा शाखेने बुधवारी १० फेब्रुवारीपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महसूल विभागाचे ग्रामीण पातळीवरील काम ठप्प पडणार असून निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन कायम ठेवण्याचा इशारा संघटनेने दिल्याने पेच निर्माण झाला आहे.या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सर्वच तलाठी आणि मंडळ अधिकारी सहभागी होत असल्याने काम ठप्प पडण्याची शक्यता आहे. ३०० तलाठी आणि ५० मंडळ अधिकारी सहभागी होत आहेत. आंदोलनाच्या व्यूहरचनेनुसार, बुधवारी सकाळी आपल्या कार्यालयाला सील लावून तलाठी त्या किल्ल्या तहसीलदारांना सोपविणार आहेत. त्यानंतर उपविभागीय अधिकारी स्तरावर त्यांच्या कार्यालयासमोर सर्र्व तलाठी आणि मंडळ अधिकारी आंदोलनाला बसणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांविरोधात प्रथमच तलाठी रस्त्यावर उतरत असल्याने या आंदोलनाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.तलाठ्यांच्या अनेक मागण्या मागील पाच वर्षांपासून प्रशासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. कालबद्ध पदोन्नतीची मागणी मागील तीन वर्षांपासून रेंगाळली आहे. अनेक तलाठ्यांची सेवा प्रदीर्घ झाली असूनही अद्यापही ज्येष्ठता यादी प्रकाशित झालेली नाही. मंडळ अधिकाऱ्यांची अनेक पदे जिल्ह्यात रिक्त असल्याने तलाठ्यांवरचा कामाचा भार वाढला शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नसल्याने ग्रामीणांच्या असंतोषाला तलाठ्यांना सामोरे जावे लागते. या मागण्यांसंदर्भात मागील अनेक काळापासून प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. मात्र महसूल विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कसलीही दखल घेतली नाही, असा संघाचा आरोप आहे.२२ सप्टेंबरला विदर्भ पटवारी आणि मंडळ अधिकारी संघाच्या जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून शिष्ठमंडळासोबत चर्चा केली होती. त्यावर लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाले होते. प्रतीक्षा करूनही पूर्तना न झाल्याने पुन्हा शिष्टमंडळाने निवेदन देवून चर्चा केली होती. तोडगा न निघाल्याने अखेर संघाने हे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.१ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या काळात तलाठ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती बांधून काम केले. त्याची दखल न झाल्याने ९ फेब्रुवारीला सामूहिक रजा आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले होते. सायंकाळी ५.३० वाजता जिलञ्याधिकाऱ्यांशी चर्चा ठरली, मात्र निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी येवून चर्चा केली. ती असफल झाल्याने अखेर १० फेब्रुवारीपासून बेमुदत लेखनीबंद आंदोलन पुकारण्याचे संघाने जाहीर केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) तलाठ्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यातील काही मागण्या आपल्या स्तरावर आहेत, तर काही वरिष्ठ स्तरावर आहेत. पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. अन्य मागण्याही आठवडाभरात पूर्ण होतील. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. त्यांना पुन्हा १२ तारखेला चर्चेसाठी वेळ दिला आहे. - डॉ. दीपक म्हैसेकरजिल्हाधिकारी, चंद्रपूरसंघाच्या मागण्या मागील अनेक वर्षांंपासून प्रलंबित आहेत. काही मागण्या तर २५ वर्षांपासूनच्या आहेत, मात्र जिल्हाधिकारी लक्ष देत नाहीत. परिणामत: नाईलाजाने हे आंदोलनाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार आहे.- संपत कन्नाकेसचिव, विदर्भ पटवारी संघ, जिल्हा शाखा