शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रक्ताचा अभूतपूर्व तुडवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे रक्तदात्यांची संख्या घटली. मध्यंतरी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत विविध ठिकाणी शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे काही प्रमाणात रक्तसाठा जमा झाला होता. आता जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढले असून, त्यांच्यासह इतर आजारी रुग्णांना रक्त द्यावे लागत आहे. साठा कमी आणि मागणी वाढल्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुडवडा आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकट त्यातच अनेकांनी लस घेतली असल्याने मागील काही दिवसांमध्ये रक्तदात्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. असे असतानाच आता डेंग्यू तसेच इतर आजारांनी तोंड वर काढल्याने रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुडवडा असून, सद्य:स्थितीत आणीबाणीची वेळ आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह खासगी रक्तपेढीमध्येही रक्त नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी तारांबळ उडत आहे. दरम्यान, रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांनी शासकीय तसेच सामाजिक संस्थांना भावनिक पत्र पाठवून रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे रक्तदात्यांची संख्या घटली. मध्यंतरी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत विविध ठिकाणी शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे काही प्रमाणात रक्तसाठा जमा झाला होता. आता जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढले असून, त्यांच्यासह इतर आजारी रुग्णांना रक्त द्यावे लागत आहे. साठा कमी आणि मागणी वाढल्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुडवडा आहे. काही रक्तदाते शासकीय रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करीत आहेत. मात्र, दररोजची मागणी जास्त असल्याने तेही कमी पडत आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन जागोजागी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करणे सध्यास्थितीत अत्यावश्यक आहे. 

असा आहे शिल्लक रक्ताचा साठासद्य:स्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रक्तपिशव्यांचा अगदीच अल्प साठा आहे. यामध्ये ए ग्रुपची एकही पिशवी शिल्लक नाही. बीच्या ४ ते ५ बाटल्या, तर ओ रक्तग्रुपच्या केवळ १० बाटल्या उपलब्ध आहेत. त्यामुळे मागणी केल्यास रक्त कुठून आणायचे, असा बिकट प्रश्न सध्या येथील शासकीय रक्तपेढीतील अधिकाऱ्यांना पडला आहे.

लोकमतने आयोजित केलेल्या शिबिरांमुळे झाला होता मोठा आधारलोकमतचे संस्थापक संपादक स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण राज्यभर रक्तदान शिबिरे घेतली होती. चंद्रपूर जिल्ह्यातही  रक्तदान शिबिरे आयोजित केली. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शासकीय रग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये मोठा रक्तसाठा जमा झाला होता. यामुळे मोठा आधार झाला होता. 

मागील काही दिवसांत रक्ताची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या घटल्यामुळे तुडवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान  करावे. यामुळे रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळेल.-डाॅ. अनंत हजारेजिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी