मूल: तालुका काॅग्रेस कमिटीच्यावतीने होऊ घातलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अविरोध निवडून आलेल्या १५ ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यावर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत होते, प्रमुख अतिथी म्हणून काॅंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राकेश रत्नावार, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष येनूरकर, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्ष रुपाली संतोषवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदीप कारमवार, आदर्श सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुरसे, नगरसेवक विनोद कामडी, ललिता फुलझेले, किसान सेलचे तालुकाध्यक्ष रुमदेव गोहणे उपस्थित होते.
मूल तालुक्यातील ३७ पैकी ३५ ग्रामपंचायतची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होणार आहे, राजगड आणि उथळपेठ या ग्रामपंचायत मधील सदस्य हे अविरोध निवडून आले आहेत, तालुक्यातील इतरही ग्रामपंचायतमध्ये काॅंग्रेस पक्षाचे १५ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. त्या सर्व सदस्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सुरेश फुलझेले यांनी केले. उपस्थितांचे आभार नगरसेवक विनोद कामडी यांनी मानले.