शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर बंद असल्याने रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मार्च २०२० पासून लाॅकडाऊन करण्यात आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तेव्हापासून रेल्वेची ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मार्च २०२० पासून लाॅकडाऊन करण्यात आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तेव्हापासून रेल्वेची प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मधल्या काळात शिथिलता मिळाली. त्यामुळे काही रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्यात आला. मात्र, पॅसेंजर अद्यापही बंदच आहे. त्यातच आता कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे या रेल्वे सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी, नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करून प्रवास करावा लागत आहे.

चंद्रपूर, तसेच बल्लारपूर रेल्वे स्थानकावर बहुतांश रेल्वे थांबतात. मात्र, आता काही विशेष गाड्यांशिवाय अन्य रेल्वे धावतच नसल्याने, रेल्वे स्थानकावरही आता शुकशुकाट बघायला मिळत आहे. विशेषत: बल्लारपूर येथून बल्लारशा-गोंदिया, बल्लारशहा-वर्धा या पॅसेंजर धावतात. मात्र, लाॅकडऊनपासून या रेल्वे गाड्या बंद आहे. परिणामी, अनेकांचा रोजगारही बुडाला आहे. पॅसेंजर बंद असल्याने या मार्गावरून प्रवास करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. त्यामुळे प्र‌वाशांचे नुकसान होत आहे. या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी आता रेल्वे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, रुग्णसंख्या वाढत असल्याने सध्यातरी पॅसेंजर सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.

मागील मार्च महिन्यापासून बल्लारपूर-गोंदिया, तसेच बल्लारपूर वर्धा ही पॅसेंजर बंद आहे. परिणामी, या मागार्वरील दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसत आहे. बसने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नाहक आर्थिक फटका बसत आहे.

बल्लारशहा-गोंदिया, बल्लारशहा-वर्धा या प्रवासासाठी पॅसेंजर गाडी आहे. मात्र, त्या बंद असल्यामुळे प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी ४०० ते ५०० रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.