शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

‘गुरुजीं’च्या सरपंचपदासाठी एकवटली महिला शक्ती

By admin | Updated: November 6, 2016 00:55 IST

राज्यघटनेने अनुसूचित जाती व जमातींना पंचायतराज व्यवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्थेत सरपंच बनण्याचे अधिकार बहाल केले.

पत्रकार परिषद : शिवसेनेसह गावकरी धडकले तहसील कार्यालयावरचिमूर : राज्यघटनेने अनुसूचित जाती व जमातींना पंचायतराज व्यवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्थेत सरपंच बनण्याचे अधिकार बहाल केले. याच अधिकारातून आॅगस्ट-२०१५मध्ये ग्रामपंचायत नवतळाच्या सरपंचपदी निवड झालेले सरपंच नथ्थू अमृत मडावी यांच्यावर सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करून विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीवरून सरपंच मडवी यांना पदमुक्त करण्यात आले. त्यामुळे नवतळा येथील नागरिक, महिलांनी या आदेशाविरूद्ध संताप व्यक्त करीत गुरूजींना सरपंचपद पुन्हा बहाल करण्यासाठी महिलाशक्ती एकवटली आहे.चिमूर तालुक्यातील शंकरपूर परिसरात वसलेल्या नवतळा ग्रामपंचायतमध्ये नऊ सदस्य असून या ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक आॅगस्ट २०१५ मध्ये घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये सरपंचपद अनुसूचित जमातीकरिता राखीव असल्याने जनपथच्या काळात गुरुजी असलेले ८७ वर्षीय नथ्थू अमृत मडावी सरपंचपदी विराजमान झाले. गुरूजी व्यवसायातून सेवानिवृत्त झालेले नथ्थू मतडावी यांनी एक वर्ष जनहिताची कामे करीत जनसामान्यात व महिलांमध्ये चांगलीच ओळख निर्माण केली.मात्र गावातील काही राजकीय गाव पुढाऱ्यांना मडावी यांचा वाढता जनाधार पचनी पडला नाही. त्यामुळे गावातील विरोधकांनी सरपंच मडावी व ग्रामपंचायत सदस्या निरीक्षणा कैलाश ढवळे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार केली. ज्या जागेवर अतिक्रमण असल्याचा अहवाल नवतळाचे तलाठी यांनी दिला त्या जागेवर सरपंच मडावी व निरीक्षणा ढवळे यांच्या पतीचे अतिक्रमण नसून ती जागा माणिक प्रल्हाद पेंदाम यांना व मृतक बळीराम भिक्य ढवळे यांना शासनाकडून मिळाली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पदमुक्त सरपंच नथ्थू मडावी व ग्रा.पं. सदस्या निरीक्षणा ढवळे यांनी दिली.तलाठी प्रदीप गुंजेवार यांनी ज्या जागेवर अतिक्रमण केल्याचा अहवाल शासनास दिला, तो अहवाल खोटा आहे. भूमापन क्रमांक ११ अंतर्गत जागा १९७६ मध्ये शासन धोरणानुसार शासकीय वाटपात माणिक पेंदाम व भूमापन क्रमांक १० अंतर्गत मृत बळीराम भिका ढवळे यांना मिळाली. मात्र या जागेवर इतर दोघांनी अपील केल्याने ८५/२००९ नुसार सदर प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. मात्र तलाठ्यांनी याच जागेवर अतिक्रमण असल्याचा अहवाल शासनास दिला व याच अहवालावरून नवतळ्याचे पदमुक्त सरपंच नथ्थू मडावी व ग्रा.पं. सदस्या निरीक्षणा ढवळे यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे.अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरूद्ध नवतळा येथील नागरिक व महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पदमुक्त सरपंच मडावी यांच्यावर शासनाने अन्याय केला आहे. आमच्या गावाला गुरुजीच सरपंच पाहिजे. ते एकदम स्वच्छ व चांगले आहेत. गुरुजींना न्याय मिळवून देण्याकरिता आम्ही तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी आल्याचेही महिलांनी सागितले.पदमुक्त सरपंच मडावी व ग्रा.पं. सदस्या निरीक्षणा ढवळे यांना खोट्या अहवालावरून पदमुक्त करण्यात आले आहे. शासनास खोटा अहवाल देणारे तलाठी प्रदीप गुंजेवार यांच्या अहवालाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी करीत गावातील पोलीस पाटील जंगीटवार यानीच शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. तथा ज्या व्यक्तीने तक्रार केली तेच व्यक्ती तलाठ्याच्या अहवालावरील पंच आहेत. तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी तलाठ्यावर कारवाई करावी व पदमुक्त सरपंच नथ्थु मडावी यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याची माहिती मधुकर शिवरकर, नामदेव ढवरे, रजनी कुमरे, लक्ष्मीकांत सुरणकर, अमोल दिघोरे यांनी सांगीतले. पत्रकार परिषदेला शिवसेना तालुका प्रमुख धरमसिंह वर्मा, उपतालुका प्रमुख स्नेहदिप खोब्रागडे, कैलाशसिंग जुनी, प्रमोद पारखी, दिनेश घुगुसकर व अमरदीप गेडाम आदींनी दिली. तसेच शिवसेना तीव्र आंदोलन करणार असल्याचेही सांगितले. (तालुका प्रतिनिधी)आम्हाला गुरुजीच सरपंच पाहिजे.. जीअनेकांनी ग्रामपंचायतमध्ये सरपंचपद १० ते १५ वर्षे उपभोगले. मात्र गावासाठी व गरिबांसाठी काहीच केले नाही. तर स्वत:साठीच केले. मात्र गुरुजी सरपंच झाल्यापासून गावाचा विकास व गरिबाले न्याय मिळत आहे. गुरुजी कुणाचा चायबी पित नाहीजी म्हणून गुरुजीला न्याय देण्यासाठी आम्ही आपली मजुरी सोडून आलो जी. आणि गुरुजीसाठी तुम्ही सांगा कोणत्या आॅफिसात जायच तर आम्ही जावू. अशी आपुलकीची भावना वच्छला शिवरकर, वंदना कुमरे, सिंधु देव्हारे, कमल मडावी, पंचफुला दिघोरे, अजरा कुमरे, रूपा मडावी, किरण मेश्राम, रत्नमाला दिघोरे आदींनी व्यक्त केली.