शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या किल्लावरील ‘युनियन जॅक’ला १९९ वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2017 00:32 IST

ब्रिटिशांनी पठाणपुरा गेटजवळ युद्ध करून गोंडराजाला पराजय स्वीकार करण्यास बाध्य केले होते.

२० मे १८१८ : ‘इको-प्रो’तर्फे युद्ध शहिदांना श्रद्धांजलीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रिटिशांनी पठाणपुरा गेटजवळ युद्ध करून गोंडराजाला पराजय स्वीकार करण्यास बाध्य केले होते. त्यानंतर त्यांनी पठाणपुरा गेटवर २० मे १८१८ रोजी ‘युनियन जॅक’ फडकविला होता. त्या घटनेला शनिवारी १९९ वर्षे पूर्ण झाली. त्या युध्दातील शहिदांना ‘इको-प्रो’तर्फे श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.चंद्रपूर शहर २० मे १८१८ रोजी इंग्रजाच्या ताब्यात गेले होते. १०-१२ दिवस चाललेल्या या युध्दात नागपूरकर भोसल्यांच्या व गोंडराजाच्या सैनिकांना पराभव स्वीकारावा लागला होता. या युध्दात चंद्रपूरचे किल्लेदार गंगासिंग जाट शहीद झाले. त्यांच्या समाधी परिसरात इको-प्रो संस्थेने स्वच्छता अभियान राबवून पुष्प अर्पण केले. यावेळी इतर शहीद सैनिकांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, गणेशसिंग ठाकूर, इको-प्रोचे नितीन बुरडकर, नितीन रामटेके व धर्मेद्र लुणावत उपस्थित होते. या युद्धात ब्रिटिश अधिकारी मेजर कोरहॅमसुध्दा मारला गेला होता. इंग्रजांनी पठाणपुरा गेट बाहेर एका शेतात मेजर कोरहॅम व इंग्रज सैन्यातील सैनिकांची समाधी बांधल्या आहेत. या परिसरातसुध्दा इको-प्रो सदस्यांनी स्वच्छता अभियान राबविले.इको-प्रोने १ मार्चपासून ‘चंद्रपूर किल्ला (परकोट) स्वच्छता अभियान’ सुरू केले आहे. आज अभियानाचा शनिवारी ७५ वा दिवस होता. र्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी इतिहासाबाबत इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाला इको-प्रो चे विनोद दुधनकर, मनीष गांवडे, हरीश मेश्राम, वैभव मडावी, विकील शेंडे, सुनील पाटील, अभय अमृतकर, सचिन धोतरे उपस्थित होते.शहीद किल्लेदार गंगासिंग जाटगंगासिंग हा आप्पासाहेब भोसल्याचा चंद्रपूर येथील एक विश्वासू किल्लेदार होता. त्याचे आडनाव दिघ्वा असे होते. जटपुरा गेट परिसरात त्याकाळी जाटांची बरीच वस्ती होती. त्यामुळे या गेटचे नाव जटपुरा गेट पडले आहे. गंगासिंगाच्या घरासमोर झालेल्या हातघाईच्या लढाईत गंगासिंग गंभीर जख्मी झाला होता. त्यामुळे त्याने विष प्राशन केले होते. कारण कैद केल्यावर इंग्रज शिक्षा करतील, असे त्याला वाटले. तसेच मरण्याआधी पठाणपुरा गेटवरील गोलदांज अलीखान तोपची याने तोफेचा मारा करून इग्रंज अधिकारी मेजर कोरहॅम यास ठार केले होते. इंग्रज अधिकाऱ्यास ठार केल्याबद्दल गगांसिंगने अलीखानला जवळ बोलावून त्याचा मोठा गौरव करून बक्षीस दिले.