शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
2
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
3
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
4
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
5
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
6
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
7
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
8
Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
9
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
10
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
11
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
12
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव
13
Platinum Investment: सोने-चांदीच्या किंमती आवाक्याबाहेर, प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे का?
14
Video: हायकोर्टच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकीलाचा महिलेला Kiss; व्हिडिओ व्हायरल...
15
Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
16
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
17
Virat Kohli: "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
18
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
19
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
20
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...

नोकरभरती बंदीने बेरोजगार निराश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:21 IST

ब्रह्मपुरी : शासनातील विविध विभागांमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकर भरतीवर सरकारने बंदी घातली आहे. ग्रामीण भागात हजारो विद्यार्थी ...

ब्रह्मपुरी : शासनातील विविध विभागांमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकर भरतीवर सरकारने बंदी घातली आहे. ग्रामीण भागात हजारो विद्यार्थी पदवीधर होत आहेत. परंतु, कनिष्ठ पदे भरण्यासंदर्भात शासनाने भूमिका घेतली नाही. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले.

प्रवासी निवारा बांधण्याची मागणी

चिमूर : शंकरपूर, ब्रह्मपुरी, कान्पा येथे जाण्यासाठी फाट्यावर यावे लागते. या फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने या परिसरातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना रस्त्यात राहून बसची वाट बघावी लागते. यावर्षी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा त्रास वाचला. मात्र या ठिकाणी प्रवासी निवाऱ्याची मागणी होत आहे.

रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

कोरपना : तालुक्यातील अनेक गावांची व गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची कित्येक वर्षे लोटूनही अवस्था जैसे थे आहे. या रस्त्याचे भाग्य उजळणार कधी, असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात आहे. आवारपूर, लोणी आदी गावाच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी

ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. तलावांचे सर्वेक्षण करण्याची मागणी आहे.

हातपंप दुरुस्तीकडे लक्ष द्यावे

नागभीड : तालुक्यातील अनेक गावांचे हातपंप नादुरुस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली. त्यामुळे बंद हातपंप दुरुस्तीसाठी पथक पाठविण्याची मागणी आहे.

अल्ट्राटेक चौकात गतिरोधक उभारा

गडचांदूर : गडचांदूर शहरातून राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. या मार्गावरून दिवसरात्र वाहतूक सुरू असते. मात्र गतिरोधक नसल्याने येथे अपघात होत आहेत.

बाजारपेठेत स्वच्छतागृहाची मागणी

राजुरा : राजुरा शहरातील भाजी मार्केटमध्ये मुत्रीघर आहे. परंतु या ठिकाणी मोठी गर्दी असते. त्यामुळे उईके चौक येथील बाजार पेठेजवळ स्वच्छतागृह बनविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी नगर परिषद, राजुरा यांच्याकडे मागणी केली आहे.

भारोसा घाटावर पुलाची निर्मिती करा

नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील भारोसा घाटावरून तीर्थक्षेत्र वढा व जुगादला जाण्यासाठी पुलांची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. या ठिकाणी पुलाची निर्मिती झाल्यास जाण्या- येण्यासाठी सोयीचे होईल.

जंगली प्राण्यांची गावाकडे धाव

चिमूर : तालुक्यातील काही गावातील शेतशिवारात जंगली प्राण्यांचा वावर वाढला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तरुणांना काम द्या

वरोरा : परिसरात मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार असून त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते नैराश्यात सापडले आहेत. त्यामुळे या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे.

जळाऊ लाकूड उपलब्ध करून द्यावे

सिंदेवाही : जंगल परिसरात असणारे ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांचा उपयोग करतात. पण, वनकायद्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. बऱ्याच कुटुंबांकडे सिलिंडर नाही. कोरोनामुळे श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेच्या निधीत कपात करण्यात आली.

रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी

सावली : तालुक्यातील काही गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेत परिसरातील रस्ते अरुंद असल्याने अपघाताची शक्यता आहे. रुंदीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सरकारी निवासस्थाने झाली दुर्लक्षित

सिंदेवाही : शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने निवासस्थाने बांधून दिलेली आहेत. मात्र याचा उपयोग अपवादानेच केला जात आहे. परिणामी या निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणी आहे.

जिवती तालुक्यातील समस्या सोडवा

जिवती : जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील अनेक समस्या आजही सुटलेल्या नाहीत. जिवती तालुक्याची स्थापना होऊन आता अनेक वर्षे झाली तरीही वीज, रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो.

रस्त्यावरील अंधार दूर करा

कोरपना : शहरातील वणी, आदिलाबाद, चंद्रपूर या तीन प्रमुख मार्गांवर पथदिवे नसल्याने परिसरात रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे या मार्गावर पथदिवे लावण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.