शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2017 00:38 IST

राजुरा तालुक्यातील रामपूर येथील चार युवकांना माणिकगड सिमेंट कंपनीमध्ये नोकरी मिळवून देतो म्हणून खोटी आर्डर देऊन ६ लाख ५० हजारांनी गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे.

सहा लाखांनी गंडविले : माणिकगड सिमेंटची खोटी आर्डर दिलीबी.डू. बोर्डेवार । लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा तालुक्यातील रामपूर येथील चार युवकांना माणिकगड सिमेंट कंपनीमध्ये नोकरी मिळवून देतो म्हणून खोटी आर्डर देऊन ६ लाख ५० हजारांनी गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे.राजुरा तालुक्यातील रामपूर येथील सतिश थेरे, संजय थेरे, राहुल थेरे आणि सचिन गौरकार हे नोकरीसाठी फिरत असताना बल्लारपूर येथील तीन युवकांनी या बेरोजगार युवकांना हेरून प्रथम चारही बेरोजगार युवकांकडून पन्नास हजार रुपयेप्रमाणे दोन लाख रुपये घेतले. काही दिवसानंतर माणिकगड सिमेंट कंपनीची आर्डर तयार आहे. तुम्ही प्रत्येक दोन लाख २५ हजार आणून द्या आणि आर्डर घेऊन जा, असे त्या युवकांकडून सांगण्यात आले. त्यानंतर सचिन गौरकार आणि सतिश थेरे यांनी दोघांचे मिळून चार लाख ५० हजार रुपये दिले. पैसे दिल्यानंतर माणिकगड सिमेंट कंपनीचे ‘प्रॉडक्शन ट्रेडसमन जनरल गेड-२’ या पदाचे खोटे नियुक्ती पत्र सचिन गौरकार आणि सतीश थेरे यांना देण्यात आले. या नियुक्तीपत्रावर कंपनीचा लोगो असून चिफ एक्झ्युक्युटिव्ह एम.व्ही. खातमोडे यांची स्वाक्षरी आहे. ही आर्डर घेऊन दोघेही कंपनीत गेले असता खोटी आर्डर असल्याचे निदर्शनास आले. फसवणूक करणाऱ्यांनी एका शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर काम झाले नाही तर पैसे परत करण्याचे लिहूनसुद्धा दिले होते. सोबतच अ‍ॅक्सीस बँकेचा चेकसुद्धा दिला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सचिन आणि सतीश हे बँकेत चेक घेऊन गेले असता अनेक दिवसांपूर्वीच खाते बंद झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्यानंतर दोन्ही युवकांनी अ‍ॅड. निनाद येरणे यांच्याशी संपर्क साधून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा तालुक्यात आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना घडत असतानासुद्धा प्रचंड बेरोजगारीमुळे सुशिक्षित बेरोजगार युवक अशा बोगस नोकरी देणाऱ्याच्या जाळ्यात अलगद अडकले जाऊन लाखो रुपयांची लूट होत आहे.फसवणूक करणाऱ्यावर कडक कारवाई कराबल्लारपूर येथील तीन युवकांनी बोगस आर्डर देऊन शेकडो बेरोजगाराची फसवणूक केली आहे. आमच्याकडून माणिकगड सिमेंट कंपनीची बोगस आर्डर देऊन सहा लाख ५० हजार रुपये नगदी घेतले. आर्थिक परिस्थिती हलाकीची असतानासुद्धा पैसे दिले. सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या बोगस व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी रामपूर येथील सतीश थेरे यांनी केली आहे.