शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:47 IST

नोकरभरतीत शासनाच्या विविध विभागात हजारो पद रिक्त असूनही भरती करण्यात आली नाही. या अन्यायाच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या बेरोजगारांनी शासकीय ग्रंथालयापासून जिल्हा अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.

ठळक मुद्देशेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती : मागण्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नोकरभरतीत शासनाच्या विविध विभागात हजारो पद रिक्त असूनही भरती करण्यात आली नाही. या अन्यायाच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या बेरोजगारांनी शासकीय ग्रंथालयापासून जिल्हा अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार डिसेंबर २०१८ मध्ये ३० हजार पोलिसांची भरती घेण्यात येणार होती. ती तात्काळ घ्यावी. म्हणजेच २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत जाहिरात देण्यात यावी, जिल्ह्यात भिषण दुष्काळ पडला असल्याने सर्व भरती प्रक्रियेतील फॉर्म विनामुल्य भरण्याची परवानगी द्यावी, पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच घेण्यात यावी, एका जागेसाठी १:१५ चार रेशो ठेवण्यात यावा, वेगवेगळ्या जिल्ह्यांची भरती वेगवेगळ्या दिवशी घेण्यात यावी, जेणेकरुन एका उमेदवारास जास्त जागी संधी उपलब्ध होईल. आधी ग्राऊंड व नंतर पेपर घेण्यात यावा, शिक्षक भरती तत्काळ जाहीर करण्यात यावी व पात्र उमेदवारांना २८ फेब्रुवारी २०१९ आधी रुजूपत्र देण्यात यावे, ७० कंत्राटी भरतीचा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा व १०० टक्के भरती ही शासकीय माध्यमातून करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांना देण्यात आले.