शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत दारूतस्कर पुन्हा सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:16 IST

आॅडिओ क्लिपमुळे पोलीस धास्तावल्याने त्यांनी दारू तस्करीकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. याच संधीचा फायदा घेत दारूतस्कर पोलिसांवर भारी पडत असल्याचे दिसत आहे. त्यांनी दारू तस्करीत कमालीची वाढ झाल्याचे बोलल्या जात आहे.

ठळक मुद्देआॅडिओ क्लिपमुळे पोलीस धास्तावले : एक पोलीस कर्मचारी निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : आॅडिओ क्लिपमुळे पोलीस धास्तावल्याने त्यांनी दारू तस्करीकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. याच संधीचा फायदा घेत दारूतस्कर पोलिसांवर भारी पडत असल्याचे दिसत आहे. त्यांनी दारू तस्करीत कमालीची वाढ झाल्याचे बोलल्या जात आहे.पोलीस व दारू तस्करांमधील देवाण घेवाणीच्या संवादाची आॅडिओ क्लिप समोर आल्यानंतर 'त्या' पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या क्लिपमुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. यात एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर अन्य पोलिसांवर संशयाचे ढग दाटले आहे. या प्रकारामुळे पोलीस चांगलेच धास्तावले आहे. याच संधीचा फायदा घेत भूमिगत दारूतस्कर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. त्यांनी काही पोलिसांना चिरीमिरीचे आमीष दाखवून दारूतस्करी सुरू केल्याची माहिती पुढे येत आहे. यात लक्कडकोट, देवाडा, धोपटाळा, सास्ती, विरूर स्टेशन व रजुºयाच्या तस्करांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे.राजुरा तालुक्याच्या सीमेला तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने तेलंगणा निर्मित दारूची आवक वाढली आहे. ही दारू लक्कडकोट, डोंगरगाव, सिंधी, नलफडी मार्गाने येत आहे. मधल्या काळात काही पोलिसांना दारू तस्करीची गुप्त माहिती मिळत होती. या आधारावर तस्करांच्या मुसक्या आवळल्या जात होत्या. पण सध्या या गुप्तचरांनी माहिती देणे बंद करून गायब झाल्याने पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यातच माहिती देऊन देखील कारवाहीविषयी आशंका असल्याने त्यांनी हात वर केले आहे. दारूसाठा कमी दाखवून सेटिंगच्या शंकेने त्यांनी माहिती देणे बंद केल्याची चर्चा आहे.दरम्यान, तस्कर व पोलिसांमधील संभाषणाची क्लिप समोर आल्याने गुप्तचरांच्या शंकेला बळ मिळत आहे. मागील एक महिन्यांपासून एकही मोठी कारवाई झाली नसल्याने संशय बळावला आहे.सध्या विरूर स्टेशनमधील एका तस्कराने सिंधी, नलफडी मार्गाने दारू तस्करी सुरू केल्याची माहिती आहे. तसेच लक्कडकोट, देवाडा येथील दारू तस्करातील काही भूमिगत तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. देवाडा परिसरातील तस्करांनी मंगी गावात डेरा मांडल्याची माहिती आहे. राजुरा व धोपटाळा, सास्ती येथील तस्करांनी पोलिसांच्या दुर्लक्षितपणाचा पुरेपूर फायदा घेत दारूची आवक वाढविल्याची चर्चा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूची खेप येत असतानाही मागील एक महिन्यात एकही मोठी कारवाई झाल्याचे पहायला मिळत नाही. त्यामुळे त्यांची बघ्याची भूमिका निर्माण करणारी ठरत आहे.दरम्यान, क्लिपमुळे पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहे की, त्यांचे तस्करांसोबत संबंध आहे, हे कळायला मार्ग नाही.