शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

विनाअनुदानित अध्यापक विद्यालये अनुदानापासून वंचित

By admin | Updated: December 10, 2014 22:55 IST

सन १९८० ते २००१ या कालावधीत मान्यता मिळालेल्या राज्यातील विनाअनुदानित अध्यापक विद्यालयाना अनुदान देण्याची मागणी कित्येक वर्षापासून शासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रलंबित आहे.

वरोरा : सन १९८० ते २००१ या कालावधीत मान्यता मिळालेल्या राज्यातील विनाअनुदानित अध्यापक विद्यालयाना अनुदान देण्याची मागणी कित्येक वर्षापासून शासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रलंबित आहे.शालेय शिक्षण विभागाने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित शाळांना अनुदान लागू केले. त्याचप्रमाणे कायम विनाअनुदानित शाळांनासुद्धा कायम शब्द काढून अनुदान देण्यात आले. मात्र जिथे प्राथमिक शिक्षक घडविले जातात तेच अध्यापक विद्यालये अनुदानापासून आजही वंचित आहे.राज्यात २००१ पूर्वी ठराविक अध्यापक विद्यालये कार्यरत होती. त्यात अनुदानित व विनाअनुदानित अध्यापक विद्यालयाचा समावेश होता. त्यानंतर २००४-०५ पासून नॅशनल कॉन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन (एनसीटीई) या संस्थेने सरसकट परवानगी देण्याचे धोरण ठरविल्याने डी.एड. विद्यालयाचे उदंड पीक आले. या अध्यापक विद्यालयाना शासनाने कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यतासुद्धा दिली. शिक्षकांना ‘टीचर्स आर दि बिल्डर्स आॅफ नॅशन’ असे म्हटले आहे. परंतु, याच गुरु समोर आर्थिक संकट उभे आहे. अनुदानाची प्रतीक्षा करीत बरेच प्राचार्य व शिक्षक सेवानिवृत्त झाले आहे. काही वयोमर्यादा पार करण्याच्या वळणावर आहेत. अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांनी पुढील आदेशापर्यंत वैयक्तिक मान्यतासुद्धा प्रदान केल्या आहेत. त्यामुळे १५ ते २० वर्ष होऊनसुद्धा उपासमारीची पाळी आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन घडविले व शिक्षक केले, त्यांचे वेतन व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांचे वेतन बघितल्यास गुरु उपाशी तर शिष्य तुपाशी अशी परिस्थिती आहे. (तालुका प्रतिनिधी)