शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अल्टिमेट संपला; २४ तासांत पाणीपुरवठा होणार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी आर्थिक अडचणीमुळे सामान्य ग्राहकांनी  तब्बल  आठ ते दहा महिन्यांचे वीजबिल भरले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे सुरू केल्यानंतर वीज बंद होईल, या भीतीने अनेकांनी बिल भरले. मात्र गावागावांतील पाणीपुरवठा योजनेतील वीजबिल भरण्यास संबंधितानी दुर्लक्ष केले आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा संयम सुटला : शासकीय कार्यालय तसेच रस्त्यावरही होणार अंधार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील बहुतांश पाणीपुरवठा योजना, पथदिवे तसेच शासकीय कार्यालयातील वीजबिल भरण्यातच आले नाही. दरम्यान, महावितरणचा प्रथम १५ दिवसांचा नोटीस कालावधी संपला असून, आता केवळ २४ तासांचा अल्टिमेट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील २४ तासांमध्ये गावागावांतील पाणीपुरवठा ठप्प पडणार असून, पथदिव्यांची तसेच शासकीय कार्यालयातील वीजपुरवठा कट केला जाणार आहे. विशेषत: चंद्रपूर तसेच वरोरा तालुक्यात प्रथम कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी आर्थिक अडचणीमुळे सामान्य ग्राहकांनी  तब्बल  आठ ते दहा महिन्यांचे वीजबिल भरले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे सुरू केल्यानंतर वीज बंद होईल, या भीतीने अनेकांनी बिल भरले. मात्र गावागावांतील पाणीपुरवठा योजनेतील वीजबिल भरण्यास संबंधितानी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता हे बिल कोट्यवधींच्या घरात पोहोचले आहे. परिणामी महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळणे कठीण झाले असून, वसुलीशिवाय पर्याय शिल्लक नाही. त्यामुळे कठोर पाऊल उचलणे सुरू केले आहे. यासाठी प्रथम सामान्य ग्राहकांना टार्गेट केल्यानंतर आता पाणीपुरवठा योजना, शासकीय कार्यालय तसेच गावागावांतील पथदिव्यांचे वीजबिल भरले नाही. त्यांच्याकडे आता महावितरणे लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार या कार्यालयाना प्रथम १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र या मुदतीतही अनेकांनी दुर्लक्ष केले. आता हा मुदत कालावधी संपला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करून महावितरणे २४ तासांचा अल्टिमेट दिला आहे. २४ तासांमध्ये वीजबिल न भरल्यास संबंधित विभागाचा वीजपुरवठा कट होणार आहे. परिणामी सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.  विशेष म्हणजे, काही शासकीय रुग्णालयाचाही यामध्ये समावेश   आहे.

१३७.२९ लाख रुपयांची थकबाकीमहावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी अशी एकूण १७३ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती ५८ कोटी १४ लाख, वाणिज्यिक ११ कोटी ३८ लाख, औद्योगिक पाच कोटी ५१ लाख रुपये थकबाकी आहे.पाणीपुरवठा थकबाकीचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेचा चार  कोटी २७  लाख, तर  सरकारी कार्यालये व इतर लघुदाब ग्राहकांकडे चार कोटी ७८ लाख, शहरी व ग्रामीण पथदिव्यांच्या वीजबिलापोटी दोन्ही जिल्ह्यातील नगरपालिकांकडे व ग्रामपंचायती असे एकूण ५२ कोटी ७२ लाख वसुली होणे बाकी आहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरण