शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महानिर्मिती प्रकल्पग्रस्तांना अखेर न्याय

By admin | Updated: May 26, 2017 00:17 IST

राज्याच्या उर्जामंत्र्यांच्या विशेष पुढाकारातून महानिर्मिती कंपनीने ११ एप्रिल रोजी जारी केलेल्या प्रशासकीय

शिक्षित युवकांनाही दिलासा : हंसराज अहीर यांचे प्रयत्नलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याच्या उर्जामंत्र्यांच्या विशेष पुढाकारातून महानिर्मिती कंपनीने ११ एप्रिल रोजी जारी केलेल्या प्रशासकीय परिपत्रकानुसार प्रगत कुशल सर्वसमावेशक योजनेला मूर्तरूप देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील आयटीआय अर्हताधारक प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी योजना कायम ठेवतानाच इतर पात्र प्रकल्पग्रस्तांना सामाजिक जबाबदारी या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय महानिर्मितीद्वारा घेण्यात आला. यात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे मोलाचे योगदान आहे.चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी म्हणून केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आघाडी सरकारच्या राजवटीपासून तर भाजपप्रणित सरकारच्या सत्तेमध्येही सातत्याने संघर्षाची भूमिका घेत येथील प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावलेला आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून अनेक आंदोलनाचे नेतृत्वही ना. हंसराज अहीर यांनी वेळोवेळी केले. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रलंबित नोकऱ्या तसेच आयटीआयधारकांना प्रगत कुशल प्रशिक्षण येथील ४५ वर्षाची वयोमर्यादा ओलांडणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना कोल इंडियाच्या धर्तीवर वयाची अट रद्द करण्याचा निर्णय घेणे तसेच ५० टक्के जागा महानिर्मितीमध्येच न ठेवता वितरण व पारेषण विभागामध्ये कुशल प्रशिक्षणार्थी तसेच डिप्लोमा डिग्री होल्डर यांना सामावून घेण्याचा निर्णय, अशिक्षित प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण देवून रोजगार देणे किंवा नोकरीऐवजी एकमुश्त पाच लाख प्रति एकरी देण्यात यावे. किंबहुना त्यांना सहा हजार रुपयांचे मासिक वेतन सुरू करावे, पहिले ते आठवीपर्यंतच्या प्रकल्पग्रस्तांना विविध कामे सोपवून किंवा अशा प्रकल्पग्रस्तांना सिक्युरिटी, वायरमन, वेल्डरसारख्या ट्रेडचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशा मागण्या त्यांनी १६ जून २०१५ रोजी मुंबई येथे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महानिर्मितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेवून केल्या होत्या. त्यांच्या या सुचनांवर अंमल करण्याचा कसोशीने प्रयत्न झालेला आहे. उपरोक्त प्रशासकीय परिपत्रकामुळे प्रकल्पग्रस्त तसेच अन्य शिक्षित बेरोजगारांना न्याय मिळाला आहे.