शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस होण्याआधीच उहापोह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2017 00:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आर्थिक व्यवहार कॅशलेस होत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रकाशित होत आहेत.

पिरली गावातील वास्तव : रोखद्वारेच होताच व्यवहार विनायक येसेकर भद्रावतीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आर्थिक व्यवहार कॅशलेस होत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रकाशित होत आहेत. अशीच एक या तालुक्यातील पिरली गावाची बातमी प्रकाशित झाली. यासंदर्भात प्रत्यक्ष गाव भेट घेऊन तेथील ग्रामस्थांशी व व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता, येथे आजही रोख रकमेद्वारे बहुतेक व्यवहार होत असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील पिरली हे एकमेव गाव कॅशलेस झाल्याची बातमी काही वृत्तपत्रात प्रकाशित झाली. या बातमीने कुतूहल जागृत होवून गावास प्रत्यक्ष भेट दिली. काही दिवसांपूर्वी एका राष्ट्रीयीकृत शाखा भद्रावतीच्या माध्यमातून या गावात शिबिर घेण्यात आला. त्या ठिकाणी मतदार यादीनुसार प्रत्येक कुटूंबाच्या कुटूंब प्रमुखाचे खाते काढण्यात आले. त्या सर्वांना डेबीट कार्ड देण्यात आले आणि गावातील चार व्यवसायीकांना स्वाईप मशीन देण्यात आल्या. याद्वारे पुढील आर्थिक व्यवहार या डेबीट कार्डद्वारे करावा, असे आवाहन शाखा प्रबंधक राजसिंह बिसेन यांनी केले. एक हजार लोकवस्ती असलेल्या या गावात १६० ग्रामस्थांची खाते उघडण्यात आली. तसेच चार दुकानदारांना स्वाईप मशीन देण्यात आली. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर काही वृत्तपत्रात संपूर्ण गाव कॅशलेस झाल्याचे वृत्त देवून आश्चर्यचकित केले. याबाबत बँकेचे शाखा व्यवस्थापक राजसिंह बिसेन यांना विचारना केली असता, आम्ही कार्यक्रमाद्वारे जनजागृती करून साहित्य पुरविले आहे. तसेच मार्च २०१७ नंतर कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठविले जाईल. गाव कॅशलेस झालेला नाही. परंतु, आम्ही त्यादृष्टीने प्रयत्नरत राहू. तालुक्यातील टाकळी व चिचोर्डी हे दोन गाव कॅशलेससाठी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)कॅशलेस व्यवहार चांगले मात्र मार्गदर्शन आवश्यककॅशलेस व्यवहार हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. शेतकरी हा वेगवेगळ्या गोष्टींच्या खेरदीकरिता कॅश घेवून शहरात जात असतो. रक्कम चोरी होण्याची भीती असते. या व्यवहाराने सुरक्षित आणि चिंतामुक्त राहू शकते. मात्र यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. आजच्या घडीला पिरली गाव कॅशलेस झाले नाही, असे मत पिरली गावातील प्रगतशिल शेतकरी नंदू वाढई यांच्यासह प्रवीण बोधाने, सामाजिक कार्यकर्ते महेश डाखरे यांनी व्यक्त केले.वृत्तपत्रात आलेली बातमी ही दिशाभूल करणारी आहे. आमच्या गावात बँक आॅफ इंडियातर्फे डिजीटल इंडियाच्या माध्यमातून शिबिर घेण्यात आले. या ठिकाणी ग्रामस्थांना डेबीट कार्ड तर व्यवसायिकांना स्वाईप मशीन देण्यात आली. परंतु, याचा वापर एक-अर्धा ग्राहक वगळता कुणीच करीत नाही.- महादेव कोल्हे,सामाजिक कार्यकर्ते पिरलीमाझ्या दुकानात बँक आॅफ इंडियाने स्वाईप मशिन लावून दिली आहे. परंतु सुरुवातीला एक-दोन ग्राहकांनी डेबीट कार्डचा वापर करून व्यवहार केला. संपूर्ण व्यवहार कॅशलेस व्हायला वेळ लागेल. या गावातील ग्रामस्थ या व्यवहाराबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहार पूर्णत: होण्यास बराच वेळ लागेल.- निलेश मोदी,व्यवसायिक पिरलीसंपूर्ण कॅशलेस व्यवहारासाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे म्हणजे संपूर्ण गाव कॅशलेस झाला असे होत नाही. याकरिता प्रशिक्षणाची गरज आहे. जोपर्यंत प्रशिक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावातील आर्थिक व्यवहार कॅशलेस होणार नाही. कॅशलेस हे दिवसास्वप्नच ठरेल.- अर्चना डाखरे गृहिणी तथाग्रामपंचायत सदस्य पिरली.