शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कुंपणाने शेत खाल्ल्याचा प्रकार

By admin | Updated: November 15, 2016 00:45 IST

राज्याचे वनमंत्री जंगलामध्ये वाढ करण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देत असले तरी, प्रत्यक्षात त्या जागेवर लागवड केलेली रोपेच नसल्याची बाब उघड झाली आहे.

रोपेच गायब : रोप लागवडीवर २० लाख रुपयांचा खर्च राजू गेडाम मूलराज्याचे वनमंत्री जंगलामध्ये वाढ करण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देत असले तरी, प्रत्यक्षात त्या जागेवर लागवड केलेली रोपेच नसल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे वन विभागाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मूल तालुक्यातील दहेगाव येथील कक्ष क्र. ५१७ मधील २५ हेक्टर क्षेत्रावर बांबूचे रोपवन लावण्यात आले होते. त्याकरिता पाच वर्षांमध्ये २० लाख रुपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात तेथे लावलेली रोपेच नसल्याने कुंपणानेच शेत खाल्ले की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. वनाचे क्षेत्र वाढावे जेणे करून जमिनीची धूप थांबविता येईल, या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाअंतर्गत वृक्ष लागवड व संगोपणावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र या उद्देशाला हरताळ फासण्यात येत आहे. २०११ मध्ये चिचपल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत मूल परिक्षेत्रातील दहेगाव येथील कक्ष क्र. ५१७ मधील २५ हेक्टर जागेवर बांबू रोपवन करण्यात. रोपवनाची संरक्षण व देखभाल करण्याची जबाबदारी वन विभागाची असताना मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावर्षी वनाची लागवड व संगोपण करण्यासाठी राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्षलागवडीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून हजारो हेक्टर जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी वन विभागाला लाखो रुपयांचा निधी वितरित करून वृक्ष लागवड करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. मात्र दहेगाव या क्षेत्रात असलेल्या प्रकारासारखा इतरही वनक्षेत्रात असलाच प्रकार आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील दोन वर्षांपूर्वी याच प्रकारचे प्रकरण उघडकीस आले होते. मात्र अधिकाऱ्यांची लॉबी मंत्र्यापर्यंत असल्याने भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठिशी घेतले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वन विभागाचे अधिकारी यात गुंतले असल्याने दहेगाव प्रकाराबाबत वाच्यता केली जात नाही. कुंपणच शेत खायला लागल्याने ते रोपे गायब होणारच, अशी सर्वत्र चर्चा केली जात आहे.विभागीय वनाधिकाऱ्यांना आढळलेले नैसर्गिक बांबूदहेगाव येथे व्यवस्थापन समितीच्या वतीने २५ हेक्टरवर बाबू रोपवनाची लागवड करण्यात आली. त्यावर २०११ ते २०१६ पर्यंत २० लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर नैसर्गिक वाढलेले काही बांबू आढळले. २०११ मध्ये रोपवन लावल्यानंतर चंद्रपूर येथील मूल्यांकन खात्याचे विभागीय वनाधिकारी आर.एच. पांडव, वनक्षेत्र सर्वेक्षक के. एम. जिडगीलवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रोपांचे मूल्यांकन केले. त्यावेळी त्यांना कक्ष क्र. ५१७ मधील रोपवनात नैसर्गिकरित्या भेरा, येन, बाबू, गराडी, धावळा, साग, रोहन, तेंदू, कडू लिंब आदी प्रजातीतील झाडे आढळून आली. कक्ष क्र. ५१७ मधील नैसर्गिकरित्या वाढलेले बांबू व इतर मिश्र रोपे दिसत असल्याने लागवडीचे बांबू कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.