बल्लारपूर: अवैधरीत्या वाळू तस्करी प्रकरणी तहसीलदार संजय राईनचवार आणि चमूनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅक्टर जप्तीची कार्यवाही केली.
पहिली कार्यवाही ही बामणी टी- पॉईंट येथे एमएच-२४ बीजी २५६४ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर करण्यात आली. दुसरी कारवाई पळसगाव येथे एमएच ३४ एपी १८४५ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर केली. दोन्ही ट्रॅक्टर जप्त केले. यात ट्रॅक्टर मालक शरद मारोती बुटले व शहरी अनचुरी यांच्यावर गौण खनिज संपत्ती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही ट्रॅक्टर मालकांकडून प्रत्येकी एक लाख १० हजार दंड आकारण्यात आला. एकूण दोन लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तहसीलदार व त्यांच्या पथकाद्वारे केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध रेती वाहतुक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.