शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन टिप्परची धडक, एक ठार

By admin | Updated: April 26, 2017 00:41 IST

गिट्टी आणि रेतीची वाहतूक करणारे दोन टिप्पर एकमेकांवर भिडल्याने झालेल्या अपघातात एक जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले.

दोन जखमी : नवेगाव पांडव फाट्यावरील घटनानागभीड : गिट्टी आणि रेतीची वाहतूक करणारे दोन टिप्पर एकमेकांवर भिडल्याने झालेल्या अपघातात एक जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना नवेगाव पांडव फाट्यावर सोमवारी रात्री ९ च्या दरम्यान घडली.अबुल अंसारी नसिमुद्दीन अंसारी असे मृताचे नाव आहे. तर इब्राहीम जमाउद्दीन अंसारी (१७) मुहवा खेर (झारखंड) व चंदन गुरुचरण महतो (२९) रा. नागपूर अशी जखमींची नावे आहेत. गिट्टी भरलेला टिप्पर ब्रह्मपुरीकडे जात होता तर रेती भरलेला टिप्पर नागपूरकडे जात होता. या दोन्ही टिप्परची नवेगाव पांडव फाट्यावर एकमेकांसमोर जोरदार धडक झाली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला.जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूरला हलविण्यात आले. अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती. धडक इतकी जबरदस्त होती की या धडकेत दोन्ही वाहणे चक्कनाचुर झाली. माहिती मिळताच ठाणेदार बी. डी. मडावी यांनी घटनास्थळ गाठले व जखमींना रुग्णालयात हलवून वाहतूक नियंत्रीत केली. (तालुका प्रतिनिधी)