शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार अंगणवाडी सेविका, सहा पुरूषांना अटक व सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:40 IST

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी गेल्या ११ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संप सुरू आहे.

ठळक मुद्देमानधनवाढीची मागणी : अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी गेल्या ११ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संप सुरू आहे. शासनाने संपाची दखल घेत नाममात्र दीड हजार रूपयाची मानधन वाढ केली. मात्र ही मानधन वाढ आम्हाला मान्य नाही, किमान पाच हजार रूपये मानधन वाढ द्या, या मागणीसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी चंद्रपुरात सोमवारी जेलभरो आंदोलन केले. यात जवळपास दोन हजार महिला व सहा पुरूषांना पोलिसांनी अटक करून सुटका केली.अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसाठी कमिटीचे गठन करण्यात आले. मात्र कमिटीच्या प्रस्तावाला शासनाने केराची टोपली दाखवली आहे. या फसवणुकीच्या निषेधार्थ अंगणवाडी कृती समितीच्या वतीने ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप सुरू आहे. राज्यभरातील २ लाख ६ हजार अंगणवाडी सेविका या संपात सहभागी झाल्या असून चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा यात समावेश आहे.जिल्ह्यातील संतप्त अंगणवाडी सेविकांनी सोमवारी संघटनेचे नेते प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केले व स्वत:ला अटक करून घेतली. दुपारी १२ वाजता गांधी चौकातून मोर्चा सुरूवात झाली. काँग्रेसचे नेते राहुल पुगलिया, शिवसेनेचे आ. बाळु धानोरकर, किशोर जोरगेवार यांनीही मोर्चासमोर येऊन पाठिंबा दिला. भाजप शासनाचा धिक्कार असो, शासनाची दडपशाही हानुन पाडा, फसव्या घोषणा देणे बंद करा, मानधन वाढ झालीच पाहिजे अशा घोषणा देत मोर्चा जिल्हा परिषदेसमोर धडकला. यावेळी प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर जवळपास दोन हजार अंगणवाडी सेविका व ६ पुरूषांना पोलिसांनी अटक करून सुटका केली.