घरीच तयार करीत होते : भांग जप्तीची पहिलीच कारवाईवरोरा : वरोरा पोलिसांच्या डीबी पथकाने वरोरा शहरातील एका घरातून २ हजार ३०० ग्रॅम भांग जप्त करीत एका व्यक्तीस अटक केली आहे. भांग जप्त करण्याची वरोरा शहरातील ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे.वरोरा शहरातील चिरघर प्लॉट परिसरातील एका घरामध्ये भांग तयार करुन विकला जात असल्याची माहिती वरोरा पोलिसांच्या डीबी पथकास मिळाली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून डीबी पथक या घरावर नजर ठेवून होते. ८ सप्टेंबर रोजी घरात भांग तयार करुन विक्री होत असल्याची माहिती डीबी पथकास मिळताच पथकाने घराची झडती घेतली असता घरात २ हजार ३०० ग्रॅम भांग व भांग तयार करण्याचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी भांग व भांग तयार करण्याचे साहित्य जप्त करीत विशाल नारायण लाखा (३२) यास अटक केली. भांग घरातून जप्त केल्याने भांग तयार करुन विक्री करणारे व भांग शौकिनांचे धाबे दणाणले आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक विलास चव्हान यांच्या मार्गदर्शनात वरोरा पोलिसांच्या डीबी पथकाने केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
वरोऱ्यात सव्वा दोन किलो भांग जप्त
By admin | Updated: September 11, 2015 01:15 IST