शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 14:00 IST

चिमूर नगरपरिषद हद्दीतील सोनेगाव बेगडे येथील दोन शेतकरी कोटगाव परिसरातील शिवारात बैल व इतर जनावरे चराईसाठी गेले असताना एका पट्टेदार वाघाने हल्ला करुन त्यांना जखमी केले.

ठळक मुद्देचराईसाठी गेले असताना केला हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चिमूर नगरपरिषद हद्दीतील सोनेगाव बेगडे येथील दोन शेतकरी कोटगाव परिसरातील शिवारात बैल व इतर जनावरे चराईसाठी गेले असताना एका पट्टेदार वाघाने हल्ला करुन त्यांना जखमी केले. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. गोपाल ढोणे (५०) व उत्तम ढोणे (३०) रा. सोनेगाव बेगडे अशी जखमींची नावे आहेत.उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होतो. त्यामुळे जनावरांना दूरपर्यंत जंगल परिसरात चराईसाठी नेले जाते. अशातच सोनेगाव बेगडे येथील गोपाल ढोणे आणि उत्तम ढोणे यांनी बुधवारी आपले बैल व इतर जनावरांना कोटगाव रिठी परिसरातील शेतशिवारात चराईसाठी नेले होते. दरम्यान, सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला चढविला. यात गोपाल ढोणे आणि उत्तम ढोणे हे गंभीर जखमी झाले. जवळपास असलेल्या नागरिकांना घटना लक्षात येताच आरडाओरड केली. त्यामुळे वाघ पळून गेला. जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.रानडुकराच्या हल्ल्यात जखमीशंकरपूरपासून जवळच असलेल्या डोमा येथील तेंदूपत्ता मजुरावर रानडुकराने हल्ला करून गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. लक्ष्मण मून(५२) असे जखमीचे नाव आहे. ते खापरी शिवारात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. अचानक रानडुकराने हल्ला केला. आजूबाजूच्या मजुरांनी आरडाओरड केल्याने रानडुकर पळून गेला.

टॅग्स :Tigerवाघ