शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

आधारस्तंभ वाकल्याने पूल कोसळण्याच्या मार्गावर

By admin | Updated: April 17, 2015 01:07 IST

महाराष्ट्र व पूर्वीचा आंध्रप्रदेश मात्र सध्याचा तेलंगाणा राज्य सीमेवरून वाहणाऱ्या वर्धा नदीवर पूल बांधकामाकरिता

वाहतुकीस धोकादायक : कोट्यवधीच्या पोळसा पुलाला भ्रष्टाचाराचे ग्रहणगोंडपिपरी : महाराष्ट्र व पूर्वीचा आंध्रप्रदेश मात्र सध्याचा तेलंगाणा राज्य सीमेवरून वाहणाऱ्या वर्धा नदीवर पूल बांधकामाकरिता स्थानिक माजी आमदार, खासदार, मंत्री महोदयांनी अहोरात्र मेहनत घेत पूल बांधकामास मंजुरी व निधी प्राप्त करून दिला. मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांनी या बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार केल्याने कोट्यवधीच्या पोळसा पुलाचा नववा आधारस्तंभ वाकला आहे. परिणामी पूल कोसळण्याच्या मार्गावर असून जड वाहतुकीस असमर्थ ठरत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.महाराष्ट्र व तेलंगना राज्याच्या सीमा जोडून दळणवळणातून नागरिकांना सुविधा, वाहनधारकांना कमी अंतर गाठून पोहचणे शक्य व व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून उत्तम सुविधा देण्याच्या हेतुने जिल्ह्याचे माजी खासदार नरेश पुगलिया, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर यांनी सतत पाठपुरावा करून शासनस्तरावरुन पोळसा-व्यंकटपूर सीमा जोडणारा वर्धा नदी पूल बांधकामाला मंजुरी मिळवून दिली. यासाठी राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कोट्यवधींचा निधी देखील बांधकामास दिला. निविदा प्रणालीतून सदर पूल बांधकामाचे कंत्राट नागपूर येथील कंपनीला मिळाले होते. तर गोंडपिपरी सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे बांधकाम देखरेखीची पूर्ण जबाबदारी होती. मात्र येथील तत्कालीन उपअभियंता व विद्यमान उपअभियंता एस.सी.तव्वर व शाखा अभियंता अमरशेट्टीवार यांनी कमीशनच्या आकसापोटी कंत्राटदारांशी हात मिळवणी करून पूल बांधकाम स्थळी हजर न राहता कंत्राटदाराला रान मोकळे करून दिले. त्यामुळे कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य, माती मिश्रीत रेती व गिट्टीचा वापर करून पूलाचे फाऊंडेशन (पायवा) बांधकाम केल्याने अवघ्या दोन ते तीन वर्षातच कामाचे पितळ उघडे पडले आहे. पूलचा नववा आधारास्तंभ वाकल्याने पूल कोसळण्याच्या मार्गावर आहे.या पूलावरुन सद्यस्थितीत जड वाहतूक बंद असून जडवाहनधारक पूल ओलांडण्यास घाबरत आहे. शासनाच्या कोट्यवधींच्या खर्चातून तयार झालेला पूल निकृष्ट दर्जाच्या कामाने नव्हे तर अल्पवृष्टीत सात ते आठ दिवस पुरात बुडल्याने ही अवस्था झाल्याचे म्हणत सा.बां. विभागाचे अभियंता काढता पाय घेत असल्याचीही माहिती आहे.निकृष्ट दर्जाचे बांधकाम व भ्रष्टाचाराच्या ग्रहणामुळे क्षतीग्रस्त होण्याच्या मार्गावर असलेल्या पोळसा पूलाला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात आले. तर माजी आ. अ‍ॅड. वामनराव चटप यांनी गोंडपिपरीतील काही ज्येष्ठ नागरिकांना पूलावरुन पायदळी चालवून संकल्प पदयात्रेचा डंकाही पिटला होता. मात्र आज घडीला पूलाची असलेली स्थिती पाहून लोकप्रतिनिधींच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. (तालुका प्रतिनिधी)जबाबदारी काढलीवरिष्ठ स्तरावर माहिती पोहचली असता सा.बां. उपविभाग गोंडपिपरीचे चंद्रपूर येथील विभागीय कार्यालय-२ यांच्या नियंत्रणाखाली तयार झालेल्या सदर पूलाची जबाबदारी काढून सा.बा. विभाग-१ कडे सोपविण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. संगनमताने गिट्टीची विक्रीवर्धा नदीवर बांधण्यात आलेल्या पूल बांधकामादरम्यान जोडमार्ग नुतनीकरणाच्या वेळी जुन्या जोडरस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यावेळेस शेकडो ब्रास गिट्टी व दगड उत्खननातून बाहेर पडले. सदर साहित्य शासन जमा करायचे असताना उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता व लगतच्या गावातील एका राजकीय पुढारी कम ठेकेदाराने संगनमत करून परप्रांतात कमी भावात गिट्टीची विक्री केल्याचे तेथील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.जोडमार्ग बांधकामात अधिकाऱ्यांची ‘पार्टनरशिप’पूल बांधकामानंतर पुलापासून गावापर्यंत पलीकडच्या काठावर बांधण्यात आलेल्या जोड मार्गाचे कंत्राट एका कंत्राटदाराचे नावे घेण्यात आले. त्यानंतर गिट्टी विक्रीतील सहकारी राजकीय पुढारी कम ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता यांनी ‘पार्टनरशिप’ करून निकृष्ट दर्जाचा रस्ता बांधल्याची ओरड आता नागरिकांमध्ये सुरू आहे.