शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

थर्मल पॉवर स्टेशनचे युनिट १ व २ बंद करा

By admin | Updated: June 16, 2014 23:27 IST

कालबाह्य झालेले, कमी उंचीचे, धूळ व राख पसरविणारे थर्मल पॉवर स्टेशनचे युनिट क्रमांक १ व २ बंद करावे, अशी मागणी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : चंद्रपूर बचाव समितीची मागणीचंद्रपूर : कालबाह्य झालेले, कमी उंचीचे, धूळ व राख पसरविणारे थर्मल पॉवर स्टेशनचे युनिट क्रमांक १ व २ बंद करावे, अशी मागणी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, महासचिव मधुसूदन रुंगठा, सदानंंद खत्री, सुहास अलमस्त, चंद्रशेखर नंदनवार, सुबोध कासलकर, अ‍ॅड. शाकीर मलिक, रोडमल गहलोत, धांडे, पराग खंडालकर आदी उपस्थित होते.निवेदनामध्ये इरई , झरपट नदी व मोठे नाल्यांची त्वरित साफसफाई करण्यात यावी, नदीतील गाळ काढण्यात यावा, आॅटोरिक्षामध्ये व अन्य वाहनांमध्ये रॉकेलचा वापर सक्तीने थांबवून प्रदुषण कमी करावे, त्याचबरोबर सी.एन.जी. व बॅटरीवर चालणाऱ्या आॅटोंना व अन्य वाहनांना प्रोत्साहित करण्यात यावे, महानगरपालिकेने रेनवाटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन द्यावे, यासाठी जनजागृती करावी व त्यांना करात सूट द्यावी, आझाद बाग व रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण करावे, शहरातील ओपन स्पेसमध्ये झाडे लावावी यासाठी डब्ल्यूसीएल, सीटीपीएस, एमईएल, सिमेंट कंपन्यांची मदत घ्यावी, रामाळा तलावाला पांचदेऊळ, जटपुरा रस्त्यापासून एप्रोच रस्ता बनविण्यात यावा व रामाळा तलावाला सुशोभित करून अतिक्रमण काढण्यात यावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यासंदर्भात खासदर हंसराज अहिर यांनासुद्धा चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने निवेदन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व समस्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले. (नगर प्रतिनिधी)