शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पट्टेधारकांना स्थायी पट्टे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:03 IST

झोपडपट्टी विकास संघटना महाराष्ट्र राज्य द्वारा एक दिवसीय जनजागृती व स्थायी पट्ट्यांच्या संदर्भात मार्गदर्शन मेळावा भद्रावती येथे पार पडला.

ठळक मुद्देबाळू धानोरकर : भद्रावतीत स्थायी पट्ट्यांबाबत मार्गदर्शन मेळावा

आॅनलाईन लोकमतभद्रावती : झोपडपट्टी विकास संघटना महाराष्ट्र राज्य द्वारा एक दिवसीय जनजागृती व स्थायी पट्ट्यांच्या संदर्भात मार्गदर्शन मेळावा भद्रावती येथे पार पडला.या मेळाव्याचे उद्घाटन आमदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार महेश शितोडे, मुख्याधिकारी विनोद जाधव, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल सोनटक्के, सल्लागार चंद्रकांत खारकर, नगरसेवक प्रफुल गौरकार उपस्थित होते.नगर परिषद हद्दीत एकूण १४ झोपडपट्ट्या आहेत. पट्ट्यांच्या संदर्भात त्यांचा सातत्याने लढा सुरू आहे. त्यांना स्थायी स्वरूपाचे पट्टे मिळालेच पाहिजे, या दृष्टीने कागदांच्या पूर्ततेसाठी न.प. भद्रावती व महसुल विभागाने सहकार्य करावे. लवकरात लवकर कागदाची पूर्तता करा, पट्टेधारकांना स्थायी पट्टे मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन आमदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.नगर परिषद भद्रावती पट्टेधारकांसोबत आहे. झोपडपट्टीवासीयांना स्थायी पट्टे मिळालेच पाहिजे, असे नगराध्यक्ष अनिल धानोरकर म्हणाले. याप्रसंगी तहसीलदार महेश शितोळे व मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी मार्गदर्शन केले. २०११ पासून झोपडपट्टीवासीय पट्ट्यासाठी प्रयत्न करीत आहो, असे चंद्रकांत खारकर म्हणाले. संचालन पवन गौरकर, प्रास्ताविक राहुल सोनटक्के तर आभार नामेश्वर देवगडे यांनी मानले.