शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने बालिकेला चिरडले, संतप्त नागरिकांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 22:24 IST

नवेगाव मोरे बसस्थानकावर आईसोबत उभी असलेल्या श्रेया मंगेश मोरे (५) या बालिकेला गोंडपिंपरीकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. घटनेनंतर ट्रकचालक गाडीसह पसार झाला. संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कघोसरी : नवेगाव मोरे बसस्थानकावर आईसोबत उभी असलेल्या श्रेया मंगेश मोरे (५) या बालिकेला गोंडपिंपरीकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. घटनेनंतर ट्रकचालक गाडीसह पसार झाला. संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.पोंभूर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे येथील श्रेया मोरे ही बालिका आईसोबत हैदराबाद येथे कामाला गेलेल्या वडीलांना भेटण्यासाठी बसस्थानकात आली होती. तिथेच दोघेही उभे होते. दरम्यान, मूलवरून गोंडपिंपरीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र.एम.एच.३२ क्यू ३४११) श्रेयाला चिरडले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर वाहनचालक महेश भाऊजी नेवारे रा. मूल हा घटनास्थळावरून पसार झाला. सदर घटनेची माहिती नागरिकांना कळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी दीड तास रास्तारोको करून वाहतूक थांबवून ठेवली. वाहन मालकाला बोलविण्यात यावे, तेव्हाच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येईल, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांचा ताफाही लगेच घटनास्थळी दाखल झाला.पोलिसांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पोंभूर्णा पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल अटक केली. पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत.