शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जाचक अटीमुळे योजनाच अडचणीत

By admin | Updated: January 15, 2015 22:48 IST

देशात संस्कृती व स्त्री सन्मानाला अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे. परंतु जाचक अटीमुळे सर्वांना शौचालय मिळणार नाही.

ग्रामस्थांचा सवाल : गाव हागणदारीमुक्त होणार कसे ?पेंढरी (कोके): देशात संस्कृती व स्त्री सन्मानाला अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे. परंतु जाचक अटीमुळे सर्वांना शौचालय मिळणार नाही. या जाचक अटीमुळे चंद्रपूर जिल्हा हागणदारीमुक्त होणार काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन सुरु केले. त्याअंतर्गत गावागावात स्वच्छतेसोबतच शौचालय बांधण्याचा उपक्रम सुरू आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले व मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यातील गावागावात जे लाभार्थी बीपीएल, एपीएल, अल्पभुधारक आहेत, अशाच लोकांना शासनाच्या योजनेच्या निधीतून शौचालय बांधून मिळणार आहे. परंतु जे लाभार्थी यात मोडत नाहीत, त्यांनी व त्यांच्या कुटुंबातील स्त्रीयांनी उघड्यावरच शौचास बसावे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घरटॅक्सपावती ऐवजी विद्युत बील, निवडणूक ओळखपत्र, जाबकार्ड, पॅनकार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड इत्यादी कागदपत्रे शौचालय बांधण्यास चालणार नाही का, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते अजब मानसिकतेमुळे शौचालय बांधण्यास तयार नाही. त्यामुळेदेखील स्वच्छतेचा फज्जा उडणार आहे व रोगांचा प्रादूर्भावसुद्धा होणार आहे. तसेच शौचालयाचे बील काढण्यास ग्रामपंचायत, संबंधित पंचायत समितीमध्ये लाभार्थ्यांना वारंवार चकरा माराव्या लागणार आहे. सदर योजना चांगली असली तरी जाचक अट योजनेलाच मारक ठरत असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)