शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

तूर डाळ साठेबाजीविरोधात तंबी

By admin | Updated: July 17, 2016 00:33 IST

जिल्ह्यात पुन्हा तूर डाळीचे दरवाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेऊन साठेबाजी केल्यास कारवाई करण्याची तंबी दिली.

पुरवठा अधिकाऱ्याची बैठक : किमतीतील तफावत कमी करण्याचे निर्देशचंद्रपूर : जिल्ह्यात पुन्हा तूर डाळीचे दरवाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेऊन साठेबाजी केल्यास कारवाई करण्याची तंबी दिली. तसेच साठेबाजी करून सर्व सामान्य ग्राहकांना वेठीस न धरण्याचा सल्लाही दिला. डाळींच्या भाववाढीला लगाम घालण्याकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिस्कीन यांनी आपल्या कार्यालयात धान्य व्यापाऱ्यांची बैठक घेतली. ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. गेल्या वर्षी तूर डाळीने भाव गगनाला भिडले होते. परिणामी केंद्र सरकारला तूर डाळ आयात करावी लागली. तसेच तूर, चणा डाळीची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात छापेमारी करुन डाळ जप्त करावी लागली होती. सध्या दरवाढ सुरु आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे परिस्थिती उद्भवू शकते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली.या बैठकीमध्ये मिस्कीन यांना व्यापाऱ्यांना तूर डाळीची साठीबाजी न करण्याचे निर्देश दिले. या शिवाय डाळ खरेदीची किंमत आणि सामान्य ग्राहकांना विक्री करण्यात येणारी किंमत या दोन्ही किंमतीमधील तफावत कमी करण्यास सांगितले. व्यापाऱ्यांनी या बैठकीत सकात्मक प्रतिसाद दिल्याचे मिस्कीन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.या बैठकीला व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी रामकिशोर सारडा, प्रभाकर मंत्री, सुरेश खांडरे, असमल शरीफ, हरी-इक्बाल अँड सन्स, मो. बुरानी, करीम हाजी अब्बास, सुरेश रोहना, शिवम हसानी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)किंमत फलक लावाअनेक दुकानदार विविध दर्जाच्या डाळ व अन्य धान्य विक्रीसाठी दुकानात ठेवतात. परंतु त्यावर किंमत निदर्शक फलक लावत नाहीत. अधिक किंमतीचा माल विकला जावा, यासाठी कमी किंमतीच्या डाळीचा फलक लावत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन मिस्कीन यांनी डाळीच्या पोत्यात किंमत दर्शविणारा फलक लावण्याचेही निर्देश दिले.