चंद्रपूर : चंद्रपूरचे माजी जिल्हा माहिती अधिकारी इंदरशहा मडावी यांना चंद्रपुरात रविवारी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार किशोर पोतनवार होते. यावेळी हिराचंद बोरकुटे, गोपालकृष्ण मांडवकर, सोमेश्वर येलचलवार, डी. के. आरीकर, अॅड. भगवान पाटील, दिनेश एकवनकर, राजू बिट्टूरवार, हातेसिंग पवार, बंटी चोरडीया, गोविंद मित्रा, सुधाकर मोकदम, रमेश काळबांधे, सुभाष थोरात, शशिकांत मोकासे आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी इंदरशहा मडावी यांच्या स्वभावाबद्दल प्रशंसा केली. चंद्रपूरचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून ते १९९९ ला रूजू झाले. २०११ पर्यंत ते चंद्रपुरात कार्यरत होते. हृदयविकाराच्या झटक्याने ११ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. ते ६५ वर्षाचे होते. त्यांच्यावर चंद्रपूर येथील शांतीधाम येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी गायत्री, सविता व पुष्पा या दोन मुली, मुलगा कपील, स्नुषा जयश्री असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. शोकसभेला ज्येष्ठ डी. के. आरीकर, गोलू बाराहाते, सुभाष थोरात, केशव तिराणिक, सोमेश्वर येलचलवार, हातेसिंग पवार आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
इंदरशहा मडावी यांना श्रद्धांजली
By admin | Updated: March 14, 2016 00:46 IST