शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलांनी तयार केलेला तिरंगा पंतप्रधान कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:14 IST

जिल्ह्यातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र बचत गटांच्या महिलांसाठी रोजगाराचे नवे माध्यम ठरले आहे. या प्रशिक्षण केंद्रात आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेला तिरंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात ठेवण्यात आला असून तो लक्षवेधक ठरला आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर बांबू प्रशिक्षण केंद्रात मिळाला हजार महिलांना रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र बचत गटांच्या महिलांसाठी रोजगाराचे नवे माध्यम ठरले आहे. या प्रशिक्षण केंद्रात आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेला तिरंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात ठेवण्यात आला असून तो लक्षवेधक ठरला आहे.राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरपासून पूर्वेस १६ कि.मी. अंतरावर चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची भव्य इमारत बांबूपासून तयार केली जात आहे. ती इमारत साकारण्यापूर्वीच विदेशी माध्यमांनी तिची दखल घेतली आहे.या प्रशिक्षण केंद्राला सुरुवात झाल्यापासून बांबूपासून तयार झालेल्या वस्तू घराघराच्या दिवाणखाण्याची शोभा वाढवीत आहेत. इतकेच नव्हे, तर दुकानासह मोठमोठ्या शोरुम व हॉटेल्समध्ये आपली स्थान निर्माण करीत आहे. यामुळे तेथे ये-जा करणाऱ्यांनाही या वस्तू भुरळ घालत आहेत. विशेष म्हणजे, या वस्तू बचत गटांच्या महिला तयार करीत आहेत.बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आजघडीला ग्रामीण भागातील एक हजार महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. या महिला आता बांबूपासून वस्तू तयार करण्यात निपून झाल्या आहेत. त्यांनी बांबूपासून तयार केलेला देशाचा तिरंगा लक्ष वेधक ठरला आहे. ज्यांनी हा तिरंगा बघितला त्यांना तो हवाहवासा वाटावा असाच आहे. या तिरंग्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भुरळ घातली.प्रशिक्षण केंद्रात आदिवासी महिलांनी तयार केलेला हा तिरंगा पंतप्रधान कार्यालयाची शोभा वाढवत आहे, हे विशेष."बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेला तिरंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात पोहचला आहे. ही चंद्रपूर जिल्ह्याचा अभिमान वाढविणारी बाब आहे. या महिलांनी बांबूपासून सरस वस्तू तयार केलेल्या आहेत. रक्षाबंधनाला तयार केलेल्या राख्यांना मोठी मागणी होती. या ठिकाणी एक हजार महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. यापुढेही हे रोजगाराचे मोठे केंद्र म्हणून पुढे येईल."

 सुधीर मुनगंटीवार,वनमंत्री, महाराष्ट्र राज्य."या महिलांनी बांबूपासून सरस वस्तू तयार केल्या आहेत. देशपातळीवर एक मोठे प्रशिक्षण केंद्र म्हणून उदयास यावे, असा आमचा मानस आहे." राहुल पाटील (आयएफएस), समन्वयक,बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली, चंद्रपूर.

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वजprime ministerपंतप्रधान