शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलेची न्यायासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव

By admin | Updated: June 26, 2017 00:43 IST

मारहाणीच्या प्रकरणाची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये देवूनही दखल घेण्यात आली नाही. पुन्हा दोन महिन्यांनंतर तोच प्रकार घडला.

वनजमीन अतिक्रमण : मारहाणीच्या तक्रारीनंतरही दखल नाहीलोकमत न्यूज नेटवर्कवडाळा : मारहाणीच्या प्रकरणाची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये देवूनही दखल घेण्यात आली नाही. पुन्हा दोन महिन्यांनंतर तोच प्रकार घडला. त्याची तक्रार देण्याकरिता आदिवासी महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली असता तिची तक्रार स्वीकारण्यात आली नाही. त्यामुळे त्या महिलेने दोन्ही घटनेची चौकशी करून न्याय मिळविण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेवून वन विभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.गेल्या २०-२५ वर्षांपूर्वी वरोरा तालुक्यातील आल्फर या गावातील महानंदा रामाजी येरमे यांचे आदिवासी कुटुंब उदरनिर्वाहाकरिता वनजमिनिवर अतिक्रमण करून शेती करीत आहे. या महिलेने २७ एप्रिल रोजी शेगाव बु. पोलीस ठाण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार देवून चौकशी करण्याची मागणी केली. मात्र या घटनेला दोन महिने होवूनसुध्दा पोलीस स्टेशनकडून दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर त्या आदिवासी महिलेने १७ जून रोजी अतिक्रमित वनजमिनीवर पऱ्हाटी व तुरीची लागवड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व वनमजूर आले.त्यांनी शेतात जबरदस्तीने खड्डे खोदण्याचे काम सुरू केले. तसेच महिलेच्या कुटुंबाला पेरणी करण्यास मज्जाव केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याचा निर्णय लागेपर्यंत पीक घेण्यास अडथळा निर्माण करू नका, असे तिचे म्हणणे आहे. तिच्या तक्रारीनुसार, वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिला मारहाण केली. त्यामुळे ही आदिवासी महिला घटनेची तक्रार देण्याकरिता त्याच दिवशी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये गेली असता स्टेशन डायरी अंमलदाराने तक्रार स्वीकारली नाही. त्यामुळे तिने २० जून रोजी वरोऱ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.वनहक्क कायद्यानुसार पट्ट्याची मागणीवनहक्क कायद्यानुसार त्यांनी जमिनीचा हक्क मिळण्याकरिता त्यांनी २००९ मध्ये वरोरा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दावा अर्ज सादर केला आहे. मात्र या अर्जावर अजूनपर्यंत निर्णय झाला नाही. त्यामुळे या महिलेने १० एप्रिल २०१७ रोजी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना २५ एप्रिल रोजी वन विभागाचे ८-१० कर्मचारी येवून त्या अतिक्रमित जागेवर शेती करण्यास या आदिवासी महिलेला मज्जाव केला. तसेच त्यांनी धमक्या देऊन शिवीगाळ केली.