शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी घेतात ३० रुपये घागर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:30 IST

जिवती तालुक्यातील मौजा शंकरपठारवासीयांवर भीषण जलसंकट ओढवले आहे. त्यांच्यावर चक्क पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देनळयोजना ठरली पांढरा हत्ती : पाण्यासाठी तीन किमीची पायपीट

फारूख शेख।आॅनलाईन लोकमतपाटण : जिवती तालुक्यातील मौजा शंकरपठारवासीयांवर भीषण जलसंकट ओढवले आहे. त्यांच्यावर चक्क पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. पाण्यासाठी तीन किमीचे पायपीट करा; अन्यथा ३०० रुपये प्रति घागर पाणी घ्यावे लागत आहे.भारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया मौजा शंकरपठार येथील ग्रामस्थ सध्या पाणी टंचाईमुळे त्रस्त झाले आहेत. एकतर गावातील एखाद्याच्या घरगुती बोअरींगवरून ३० रुपये घागर याप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे. नाहीतर तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पिट्टीगुडा येथून पाणी आणावे लागत आहे.८० घरांची वस्ती असणारे शंकरपठारची लोकसंख्या ५०० च्या जवळ असून गावात शासकीय बोअरवेल व दोन विहिरीही आहेत. सदर बोअरवेल मागील दोन वर्षांपासून बंद असून विहिरींनीही तळ गाठला आहे. गावात लाखो रुपये खर्चुन नळयोजना कार्यान्वित केली. मात्र तीदेखील विद्युत बिल न भरल्याने मागील चार वर्षांपासून बंद आहे. यामुळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.गावात दोन घरगुती हातपंप आहेत. ज्यांच्या मालकीच्या हे हातपंप आहे, ते एक घागर पाण्यासाठी ३० रुपये घेतात. ज्यांच्याकडे पाणी विकत घेण्यासाठी पैसे नाही, त्यांना तीन किमी बैलगाडीने पहाटे ४ वाजतापासून पाण्यासाठी पिट्टीगुडा येथे जाऊन पाणी आणावे लागत आहे. आता उन्हाळ्याची चाहुल लागताच पिट्टीगुडावासीयांनीही पाणी नेण्यास बंदी घातली आहे, असे गोपीनाथ भगवान पोले, हरी नागोराव बाजगीर, नारायण नागोराव बाजगीर या गावकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शंकरपठार येथे नवीन बोअरवेल खोदण्यासाठी शासनकडे प्रस्ताव पाठविला असून मंजुरी मिळताच बोअरवेल खोदली जाईल.- संजय आत्राम, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत, भारी.