शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या दारातले झाड आता पैशाचे !

By admin | Updated: January 1, 2015 22:59 IST

शेतात पैशाचे झाड लागले असते तर किती बरे झाले असते, हे वाक्य हमखास ऐकायला मिळते. मात्र, असे झाड काही लागत नाही आणि पैसे काही मिळत नाही; पण आता शेतकऱ्यांसाठी त्यांच्या दारातील झाड पैशाचे ठरणार आहे.

शासन उपक्रम : जपणुकीसाठी मिळणार पैसेचंद्रपूर : शेतात पैशाचे झाड लागले असते तर किती बरे झाले असते, हे वाक्य हमखास ऐकायला मिळते. मात्र, असे झाड काही लागत नाही आणि पैसे काही मिळत नाही; पण आता शेतकऱ्यांसाठी त्यांच्या दारातील झाड पैशाचे ठरणार आहे. पैशाचे झाड तोडू नये यासाठी सरकारच या झाडाचा सांभाळ करण्याचे पैसे शेतकऱ्यांना देणार आहेत. यासंदर्भात लवकरच निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी नव्या वर्षात होणार आहे. शेतातील झाड हे वैभवच. पण अनेकदा शेताचे हिस्से होतात. ज्याच्या वाट्याला झाड आले त्याच्याकडून गरज म्हणून त्या झाडांची कत्तल ठरलेलीच असते. अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना याच झाडांचा आधार असतो. नेमकी वेळ साधून कमी पैशात झाडे तोडून नेणाऱ्या व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळ्याही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. त्याचे सरकारी अधिकाऱ्यांशी लागेबांधे असतात. या जोरावर मग आवाज बंद करून शेतकऱ्यांची लूट केली जाते. या झाडांची कत्तल होऊ नये व त्यांची जपणूक व्हावी यासाठी शेतकऱ्यांना काही प्रोत्साहनपर रक्कम शासन देणार आहे. दारात, शिवारातील उभे झाड पैसे देणारे झाड असल्यामुळे त्याचा सांभाळ उत्तम प्रकारे होऊन पर्यावरणाचा ढासळणारा समतोल राखण्यासाठी त्याची मदत होणार आहे. झाड किती वर्षांचे आहे, यासह अन्य तांत्रिक बाजूची नोंदणी करून प्रत्येक झाडामागे शेतकऱ्यांना थेट पैसे देण्याचा विचार शासनस्तरावरुन सुरू आहे. शतकोटी वृक्ष लागवडीसारखे उपक्रम सरकारने हाती घेतले. मात्र रोज होणारी वृक्षतोड आणि वृक्ष लागवडीत आलेले अपयश यांचा विचार करता, तिचं झाडे कशाप्रकारे जगवता येतील याचा विचार प्राधान्याने पुढे आला. नव्याने झाडे लावली पाहिजेत. लागलेले झाड जगविण्यासाठी काही उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यातूनच मग उभ्या झाडाला प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा विचार शासन पातळीवर पुढे आला आहे. या निर्णयावर शिक्कामोर्तब होताच अंमलबजावणी केली जाणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)