शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

वृक्षलागवडीची जगाने घेतली नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:42 IST

वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, वृक्षलागवडीच्या संदर्भातील सर्व बाबींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्यात वृक्षलागवड कार्यक्रम सुरु आहे. सुरुवातीला वृक्षलागडीच्या या मोहिमेला सहजतेने घेणारे अनेक जण आता गंभीरतेने या मोहिमेचे पाईक झाले आहेत.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : विचोडा येथे वृक्षारोपण
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, वृक्षलागवडीच्या संदर्भातील सर्व बाबींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्यात वृक्षलागवड कार्यक्रम सुरु आहे. सुरुवातीला वृक्षलागडीच्या या मोहिमेला सहजतेने घेणारे अनेक जण आता गंभीरतेने या मोहिमेचे पाईक झाले आहेत. राष्ट्रपती भवनापासून अमेरिकेच्या दूतावासापर्यंत पर्यावरण पुरक मोहिमेची नोंद घेतली जात आहे. महाराष्ट्रातील वृक्षलागवड आता जागतिक झाली असून त्याची नोंद सर्वत्र घेतली जात आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूरच्या समाज जीवनावर सामाजिक कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या विविध सामाजिक संघटनांच्या वतीने विचोडा येथे शुक्रवारी वृक्षरोपण कार्यक्रम पार पडला. वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मनपा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, संकल्प गार्डन क्लब चंद्रपूरचे डॉ. अशोक वासलवार, ज्येष्ठ पत्रकार कल्पना पल्लीकुंडवार, सीमा मामीडवार, शाहीन शफीक आदींसह, जिल्हा बँक, रोटरी क्लब, आयएमए, डिस्ट्रीक्ट केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोशिएशन, एमएसएमआर, ग्रा. पं. विचोडा, छोटी पडोली आदी संघटना व संस्थांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी १३ कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमामध्ये शासन राबवित असलेल्या उच्च तंत्रज्ञानाच्या वृक्षलागवड व वृक्ष संगोपनाच्या तंत्राची वनमंत्र्यांनी माहिती दिली.प्रत्येक वृक्षाचे होणार आॅडीटसुधीर मुनगंटीवार : विचोडा येथील कार्यक्रमात दिली माहितीवनविभागाच्या नागपूर येथील कार्यालयात कमांड रुम निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये दर सेंकदाला होत असलेल्या वृक्ष लागवडीची नोंद घेतली जाते. एक मोठा डिस्प्ले बोर्ड या ठिकाणी उभारण्यात आला आहे. त्यावर ही आकडेवारी सर्वसामान्यांना माहिती पडते. यावर्षी लावण्यात येणाºया प्रत्येक रोपाचे स्थळ नोंदण्यात येत असून सहा महिन्यानंतर या रोपट्यांची स्थिती देखील माहिती पडणार आहे. यावर्षी लावण्यात आलेल्या प्रत्येक वृक्षाचे आॅडीट केले जाणार असून पर्यावरण प्रेमी ड्रोन कॅमेºयाच्या माध्यमातून वृक्षलागवडीवर व वृक्षसंगोपनावर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.वनविभागाने आपल्या नेतृत्वात ग्रिन आर्मीची (हरितसेना) निर्मिती केली आहे. ही हरितसेना एक कोटीची करण्याची आपली महत्वाकांक्षा आहे. त्यामुळे पर्यावरण व वृक्षलागवड ही काही वर्षाचीच मोहिम न राहता, कायम व निरंतर चालणारी प्रक्रिया ठरेल, अशी आशा व्यक्त केली. वृक्षलागवडीमध्ये ड्रोनसारख्या कॅमेराचा सक्रिय वापर, लागवडी संदर्भातील होणारे मॅपींग, लागवडीचे आॅडीट या सर्व बाबींमुळे लावलेली झाडे, जगलेली झाडे या सर्व बाबी अतिशय पारदर्शी होत असून याची दखल अमेरीकेसारख्या प्रगत राष्ट्राने घेतली आहे.अमेरीकेच्या दूतावासातील राजदुतांनी या घडामोडीची दखल घेत, ही मोहिम कशी राबविली जात आहे, याची माहिती घेतली. सिंगापूरच्या राजदुताने बांबू लागवडीच्या माध्यमातून हिरवाई आणण्याबाबत जाणून घेतले असून हा प्रयोग त्यांच्या देशात करण्याबाबत ते उत्सुक आहेत, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.वृक्षलागवडीचा समारोप औरंगाबादला होत असून त्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. राष्ट्रपतींनी या मोहिमेचे कौतुक केले. त्यांनी हैद्राबाद येथील राष्ट्रपती भवनात चंद्रपूर वनविभागाने बांबूच्या प्रजातींची लागवड करावी व तो भाग हिरवा करावा, असे निमंत्रण दिले आहे. आता राष्ट्रपती भवनात देखील चंद्रपूरचा बांबू पोहचणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महानायक अमिताभ बच्चन यांच्या कार्यालयात चंद्रपूरचा झेंडा पोहोचला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे आभार अनिल डोंगरे यांनी मानले. यावेळी सरपंच किरण डोंगरे, उमेश वासलवार, मनोज दुधानी, मनोज कांबडे आदींची उपस्थिती होती.