शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बॉटनिकल गार्डनमधून वृक्ष प्रजातींचे जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:48 IST

वन विभाग आणि राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था, लखनऊ (नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्युट) यांच्यात बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला.

ठळक मुद्देवनमंत्र्यांची माहिती : एनबीआरआयसोबत वन विभागाचा करार

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : वन विभाग आणि राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था, लखनऊ (नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्युट) यांच्यात बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला. यातून चंद्रपूर जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या बॉटनिकल गार्डनच्या माध्यमातून विदर्भातील वृक्ष प्रजातींचे सरंक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.बुधवारी मुंबई येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार झाला. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्युट ही केंद्र सरकारच्या सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट अंतर्गत काम करणारी संस्था असल्याचे सांगून ना. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारशहा मार्गावर विसापूर येथे साकारल्या जाणाºया जैवविविधता उद्यानासाठी या राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेची तांत्रिक मदत होणार आहे.विदर्भ जैवविविधतेने संपन्न असा प्रदेश आहे. वनस्पती आणि प्राण्यांचे मुळ वंशज जंगलातच आढळून येतात. त्याचे रक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे. दुर्मिळ आणि धोकाग्रस्त प्राणी आणि वनस्पतींचे संरक्षण आणि संवर्धन करणे, जनसामान्यांना जैवविविधतेचे महत्त्व पटवून सांगणे, जनजागृती करणे, दुर्मिळ जैवविविधतेचे संवर्धन करणे, स्थानिकांना रोजगार निर्मिती करून देणे या उद्देशाने चंद्र्रपूर जिल्ह्यात हे जैवविविधता उद्यान उभारले जात आहे.यासाठी वन तसेच महसूल विभागाने जागा उपलब्ध करून दिली असून या उद्यानात कुतूहल निर्माण करणाºया सायन्स पार्क, सायन्स राईड यासह विविध कामे प्रस्तावित आहेत. वृक्ष प्रजातींच्या अभ्यासकांसाठी हे एक एकात्मिक अध्ययन केंद्र ठरावे, या माध्यमातून विदर्भातील वृक्ष तसेच वन्यजीव प्रजातींची सर्वंकष माहिती राज्यातील जनतेला आणि या क्षेत्रातील संशोधकांना मिळावी, हा प्रयत्न असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील जैवविविधता उद्यानाच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी वन विभागाला या बैठकीत दिल्या.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार