शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड ही चळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:35 IST

शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येकाचा वाटा असणे महत्वाचे आहे. वृक्ष संपदा ही अनन्यसाधारण व मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. परिणामी वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.

ठळक मुद्देशांतनू गोयल : ईटगाव येथे वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येकाचा वाटा असणे महत्वाचे आहे. वृक्ष संपदा ही अनन्यसाधारण व मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. परिणामी वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.पवनी तालुक्यातील ईटगाव येथे सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी उपवनसंरक्षक विवेक कोशिंग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, तहसीलदार अक्षय पोयाम, गटविकास अधिकारी नूतन सावंत, सामाजिक वनिकरणाचे विभागीय अधिकारी आर.एन. विधाते, सहायक वनसंरक्षक आर.डी. चोपकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सोनम ढोले, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता संजीव जगताप, सरपंच गुलचंद बांते, माणिक मरकाम, राजुराचे सरपंच शंकर मडावी, ग्रीन हेरिटेज संस्थेचे मोहम्मद शहीद शेख, शाहीद खान, पी.आर. बीडीकर, देवतारे व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित अतिथींनी वृक्ष लागवडीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांसह सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. वृक्ष लागवड मोहिमेत शाळेतील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला होता. ही मोहिम महिनाभर चालणार आहे.५४ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्याला ५३ लाख ९९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात सर्वात मोठा वाटा वनविभागाकडे आहे. यात वृक्ष लागवडीसाठी सहा हजार २७ साईटची नोंदणी करण्यात आली आहे. यात सर्व प्रशासकीय विभागाने ५७ लाख २१ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन तयार केले असून यासाठी ५० लाख खड्डे खोदण्यात आली आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत, कृषी विभाग व इतर शासकीय, प्रशासकीय विभाग म्हणून उद्दीष्ट पूर्ण करणार आहे. यात सार्वजनिक उपक्रमांतर्गत नागरिकांचे सहकार्य अपेक्षीत आहे