शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘आशा क्लिनिक’मुळे होऊ लागला रुग्णांवर गावातच उपचार

By admin | Updated: August 24, 2015 01:16 IST

अतिदुर्गम भागात हलाकीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ....

आरोग्य विभागाचा नावीन्यपूर्ण उपक्रम : रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्नजिवती : अतिदुर्गम भागात हलाकीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिवतीचे संवर्ग विकास अधिकारी संदीप गोडसीलवार यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘आशा क्लिनिक’ या योजनेचा पहिला प्रयोग पाटण आरोग्य केंद्रातील आंबेझरी गावात सुरू करण्यात आला. जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.या योजनेच्या माध्यमातून गावातील आशा स्वयंसेविकांना खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण करणे. तसेच लोकसहभागातून आरोग्य सेवेचा दर्जा उंचावतो, लोकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती व सुदृढ आरोग्य सेवेची गरज निर्माण करुन समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न या योजनेतून करण्यात येणार आहे. पहाडावरील गरीब व गरजू व्यक्तींना एकाच छताखाली त्यांच्याच गावामध्ये प्राथमिक व किरकोळ स्वरूपाच्या आरोग्य सेवा आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून कमीत कमी दरात रुग्णास उपलब्ध करुन देण्यात येणार असून या योजनेतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ५० टक्के उत्पदनाच्या माध्यमातून लोकांना आरोग्य सेवा पुरविणे व उर्वरित ५० टक्के उत्पन्नातून स्वयंसेविकेस मानधन स्वरूपात रोजगार मिळवून देण्यासाठी ‘आशा क्लिनीक’ या नाविन्यपूर्ण योजनेची संकल्पना तयार करण्यात आली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आशा क्लिनिकची स्थापना करण्यात येणार असून यासाठी लागणारी साधन सामुग्री ही ग्रामपंचायतीमधून पुरवठा केली जाणार आहे. त्यात गावपातळीवर आशा क्लिनिक समिती गठीत करणे व ठिकठिकाणी आरोग्य सेवासत्र भरविण्याची जबाबदारी गावातील आशा स्वयंसेविकेवर सोपविण्यात आली. या योजनेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)जिवती तालुका हा अतिदुर्गम भागात असल्याने येथील दळणवळणाच्या व आरोग्याच्या सोयी सुविधा पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. यासाठी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आंबेझरी गावात आशा क्लिनिक ही योजना प्रायोजिक तत्वावर केली. रुग्णांना गावातच उपचार मिळणार आहे. येथील जनतेचा प्रतिसाद पाहता तालुक्यातील प्रत्येक गावातच या योजनेचा शुभारंभ करण्याचा मानस आहे.- संदीप गोडसेलवारसंवर्ग विकास अधिकारी, जिवती