शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मुदतबाह्य सलाईनद्वारे रूग्णांवर उपचार

By admin | Updated: April 8, 2015 00:00 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णांना उपचारादरम्यान मुदतबाह्य सलाईन दिल्याचा प्रकार रविवारी उघडकिस आला....

ब्रह्मपुरीतील प्रकार : वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञब्रह्मपुरी : येथील ग्रामीण रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णांना उपचारादरम्यान मुदतबाह्य सलाईन दिल्याचा प्रकार रविवारी उघडकिस आला. या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.ब्रह्मपुरी शहरात विविध वैद्यकीय सुविधा लक्षात असल्याने आरोग्य नगरी म्हणून शहर प्रसिद्ध आहे. शहरात अनेक मोठमोठी खासगी रुग्णालये असली तरी सर्वसामान्य नागरीक ग्रामीण रुग्णालयाचा आधार घेतात. हक्काचे रुग्णालय म्हणून ग्रामीण भागातील जनता या रुग्णालयात उपचारासाठी येतात. चौगान येथील लताबाई लवकुश चंदनबावणे या महिलेला रविवारी ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने त्यांना सलाईन लावले. सलाईन लावल्याच्या काही वेळातच लताबाईला अस्वस्थता वाटू लागली. दरम्यान त्याच वॉर्डातील बाजूच्या खाटेवर असलेल्या रुग्णाची मुलगी वडिलांना बघायला आली, तिने वडिलांना लावण्यात आलेल्या सलाईनवरील छापील दिनांक बघितला असता, मुदतबाह्य सलाईन लावल्याचे लक्षात आले. तिने लगेच इतर रुग्णांचे सलाईन बघितले ते सुद्धा कालबाह्य असल्याचे दिसून आले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेच्या लक्षात ही बाब येताच तिने सर्व रुग्णांचे सलाईन काढून घेतल्या. लताबाई यांची सलीन वेळीच काढल्यामुळे त्यांचे प्राण बचावले.हा प्रकार गंभीर असल्यामुळे उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांनी ६ एप्रिलला ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. खंडाळे व तहसीलदार वानखेडे यांच्याकडे लेखी तक्रार देऊन बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तसेच कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने कालबाह्य सलाईन काढल्यानंतर सर्व रुग्णांच्या बळजबरीने केसपेपर असलेल्या फाईलवरील कोऱ्या कागदांवर स्वाक्षऱ्या घेतल्या असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणामुळे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय अधीक्षक काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)