शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अन् दुर्धर आजारग्रस्त महिलेवर मुंबईत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 23:39 IST

दुर्धर आजाराने पीडित असलेल्या निशा मैती या महिलेस आमदार बाळू धानोरकर यांनी एक लाखाची मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली़ ‘लोकमत’ने निशा मैती यांची व्यथा जनतेसमोर मांडली होती़ ....

ठळक मुद्देलोकमतच्या पाठपुराव्याला यश : बँकेच्या खात्यात जमा केली रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : दुर्धर आजाराने पीडित असलेल्या निशा मैती या महिलेस आमदार बाळू धानोरकर यांनी एक लाखाची मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली़ ‘लोकमत’ने निशा मैती यांची व्यथा जनतेसमोर मांडली होती़ त्यामुळे छापा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला होता़ पीडित महिलेवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहे़निशा मैती यांना बोनम्यारो फेल्युअर नावाचा आजार झाला आहे़ आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने छावा ग्रुप व एक हाथ मदतीचा या समितीने प्रयत्न सुरू केले़ विशेष म्हणजे लोकमतने वृत्त प्रकाशित करून नागरिक अथवा लोकप्रतिनिधींनी मदत करावे,़ असे आवाहन केले होते़ परिणामी, २ महिन्यापूर्वी मुंबई येथे झालेल्या बैठकीत आमदार बाळू धानोरकर यांनी १ लाखाची मदत जाहीर केली होती़ दिवाळीत त्या आजारग्रस्त बहिणीला भाऊबीज ओवाळणीच्या स्वरूपात १ लाखाची मदत बँकेच्या खात्यात जमा केली़काही महिन्यापूर्वी गावातून मदत रॅली काढून युवकांनी निधी गोळा केला़ सामाजिक कार्यकर्ते अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी मदत केली़ परंतु, त्यातून उपचार करणे कठीण झाले होते़ दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीतून उपचारासाठी मदत करून असेही काहींनी आश्वासन दिले होते़ त्यामुळे आयोजन समितीचे सदस्य ओम चावरे , दीपक गोंडे , तुषार कडू रवी पाटील यांनी मुंबई गाठली़ मंत्रालयाच्या चकरा मारूनही निराशा वाट्याला आली होती़अखेरचा पर्याय म्हणून आ. धानोरकर यांच्याकडे मदतीची मागणी करण्यात आली असता एक लाख रुपये देण्याचे मान्य केले़ शिवाय ऐन भाऊबीज सणाला निशा मैती यांच्या बँकेच्या खात्यात रक्कम जमा करून आश्वासन पाळले़