शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

केंद्रप्रमुखांना प्रवासभत्ता नवीन दराने देऊ

By admin | Updated: February 3, 2015 22:53 IST

शिक्षणाचे पवित्र कार्य करताना विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता शिक्षकांनी घेतली पाहिजे. केंद्रप्रमुखाच्या मागण्या रास्त असून त्या त्वरित निकाली काढण्यात येईल,

चंद्रपूर : शिक्षणाचे पवित्र कार्य करताना विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता शिक्षकांनी घेतली पाहिजे. केंद्रप्रमुखाच्या मागण्या रास्त असून त्या त्वरित निकाली काढण्यात येईल, केंद्र प्रमुखांचा प्रवास भत्ता नवीन दराने लागू केला जाईल, असे आश्वासन वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संघ जिल्हा शाखा चंद्रपूरच्यावतीने विभागीय शैक्षणिक कार्यशाळा व अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.या संमेलनाच्या प्रथम सत्रात ‘शैक्षणिक गुणवत्ता विकासात केंद्र प्रमुखाची भूमिका’ या विषयावर अर्जुन साळवे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्राचार्य शरदचंद्र पाटील, गौतम मेश्राम, रामराव जगदाळे, जयवंतराव दुबे यांनी आपले विचार व्यक्त केले. केंद्र प्रमुख शिक्षण प्रक्रियेतील कणा आहे. गुणवत्ता वाढीस केंद्रप्रमुखांवर सोपविलेली जबाबदारी पूर्ण केल्यास नक्कीच गुणवत्तवा वाढेल असे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. केंद्र प्रमुखांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली तर शिक्षणाचा दर्जा वाढतील, असेही उपस्थितांनी मत व्यक्त केले. यावेळी विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद शिक्षण सभापती देवराव भोंगळे होते. त्यांनी केंद्रप्रमुखांना दोनशे ऐवजी सहाव्या वेतन आयोगातील तरतुदीप्रमाणे एक हजार ६५० रुपये भत्ता व कर्तव्य जबाबदारीत वाढ झाल्यामुळे वेतनवाढ व इतरही मागण्या रास्त असून शासनस्तरावर पाठपुरावा करून सोडविण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा केंद्रप्रमुख संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचसोबत केंद्रप्रमुख रामराव हरडे, जयवंतराव दुबे, गौतम मेश्राम, नामदेवराव झाडे, सीमा फेंडर, कल्पना दुरुगकर, जयवंत उपाध्ये, ई.एन. येळणे, अशोक आळे आदी पदाधिकाऱ्यांचाही राज्याध्यक्ष अर्जूनराव साळवे यांच्या हस्ते करण्यात सत्कार करण्यात आला. संमेलनाला नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील केंद्रप्रमुख उपस्थित होते. केंद्राची पुर्नरचना करून केंद्रप्रमुखांची पदे भरणे, केंद्रप्रमुखातूनच शिक्षण विस्तार अधिकारी पद भरावे,केंद्रप्रमुख प्रवासभत्ता, ग्रेड पे, वेतनवाढ देण्यात यावी आदी मागदण्यांचे एक निवेदनही मुनगंटीवार यांना देण्यात आले. संचालन सबतकौर भौंड व राजेंद्र पाटील, प्रास्ताविक रामराव हरडे तर आभार मारोतराव रायपूरे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)