शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन समिती कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:42 IST

सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी सर्व शाळांमध्ये परिवहन समितीची स्थापना करण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत. मात्र जिल्ह्यातील शाळाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी परिवहन समिती कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देशाळांचे दुर्लक्ष : स्कूल बसमधून विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी सर्व शाळांमध्ये परिवहन समितीची स्थापना करण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत. मात्र जिल्ह्यातील शाळाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी परिवहन समिती कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.विद्यार्थ्यांचा घर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये शालेय स्कूलबस परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश दरवर्षी राज्य शासनाकडून देण्यात येतात. त्यानुसार मुख्यध्यापकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येते. त्यामध्ये पालक संघाचे प्रतिनिधी, बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी, परिवहन विभागाचे मोटार वाहन निरिक्षक, पोलीस विभागाचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो. परंतु शाळेकडून या समितीची स्थापना करण्यात येत नाही. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा घर ते शाळा व शाळा ते घर हा प्रवास धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. ज्या शाळा परिवहन समितीची स्थापना करत नाही, अशा शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करणे अपेक्षीत आहे. मात्र शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.वाहतूक विभागाकडे नोंदच नाहीशाळा परिवहन समितीची स्थापना करुन त्याची नोंद वाहतूक विभागाकडे करावी, असे राज्य शासनाने निर्देश आहेत. मात्र जिल्ह्यातील शाळेने समितीची स्थापना करण्याकडे दुर्लक्ष केल्याने वाहतूक विभागाकडे समितीची नोंदच नाही. त्यामुळे शालेय बसमधून विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक असल्याचे दिसून येत आहे.पालकविभाग अनभिज्ञदिवसेंदिवस विविध शाळा विद्यार्थ्यांना व पालकांना आकर्षित करण्यासाठी शाळेमध्ये अनेक सुविधा करीत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेच्या असणाऱ्या परिवहन समितीच्या स्थापनेकडे कानाडोळा करीत आहेत. याबाबत पालक अनभिज्ञ असल्याने तेसुद्धा समिती स्थापनेबाबत शाळांना विचारणा करीत नाही. परिणामी राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाकडे शाळा अधिकाºयांमुळे हरताळ फासली जात आहे.