शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसच्या टपावरुन जनरेटरची वाहतूक

By admin | Updated: March 4, 2016 01:01 IST

एसटी बस मधून ज्वलनशिल पदार्थाची वाहतूक करण्यास सक्त मनाई असतानाही एसटी बसच्या टपावर जनरेटर ठेवून डिजे वाजवीत एसटीतून प्रवास करणाऱ्यांनी..

प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ : राजुरा आगाराची बसवरोरा : एसटी बस मधून ज्वलनशिल पदार्थाची वाहतूक करण्यास सक्त मनाई असतानाही एसटी बसच्या टपावर जनरेटर ठेवून डिजे वाजवीत एसटीतून प्रवास करणाऱ्यांनी चौकाचौकात डिजेच्या तालावर ठेका देत होते. हा प्रकार अनेक नागरिकांनी बघत एसटी महामंडळाने नियम धाब्यावर ठेवल्याची चर्चा करीत होते.राजुरा आगाराची एसटी बस प्रासंगिक करारावर देवून नागपूरकडे निघाली. तेव्हा या एसटी बसच्या टपावर जनरेटर ठेवण्यात आले होते. त्यासोबतच डिजेही बसच्या टपावर होते. जनरेटरद्वारे डिजे मोठ्या कर्कश आवाजाने चालू बस मधून वाजविण्यात येत होता. एखाद्या शहराच्या चौकात बस थांबवून त्या एसटी बस मधील प्रवासी खाली उतरुन डिजेच्या तालावर नाचत होते. हा प्रकार अनेक नागरिकांनी अनुभवला. परंतु, डिजेच्या तालावर ठेका धरणारे प्रवासी कुणाकडेही लक्ष देण्याची तसदी घेत नव्हते. डिजेच्या आवाज मर्यादेवर न्यायालयाने निर्बंध घातले असताना डिजेच्या आवाजाची मर्यादाही पाळली गेली नाही. एसटी बसच्या टपावर ठेवण्यात आलेल्या जनरेटरमध्ये डिझेल होते. त्यामुळे ज्वलनशिल पदार्थाची एसटी बसमधून वाहतूक करण्यास कुणी परवानगी दिली असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व नियमांना तिलांजली देत एसटी बस वरोऱ्याकडून पुढील प्रवासासाठी नागपूरकडे निघाली. प्रवाश्यांच्या जिवीताशी खेळण्याचा हा प्रकार असून एसटी बसच्या टप्पावर जनरेटर व डिजे ठेवून वाजविण्याची परवानगी दिली होती काय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. (तालुका प्रतिनिधी)