शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन महामंडळाचे कर्मचारी वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 05:00 IST

सात महिने वाहतूक बंद असल्याने कर्मचाºयांना टप्पाटप्यात वेतन देण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. थकीत असलेले वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले. मात्र आता जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यांचे वेतन अद्यापही झालेले नाही. दोन दिवसांनंतर सप्टेंबर महिना पूर्ण होणार आहे. तरीसुद्धा वेतन देण्यात आले नसल्याने त्याचे अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळे थकीत वेतन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा : थकीत वेतन देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : टाळेबंदीचा सर्वात मोठा फटका बस महामंडळाला बसला आहे. शंभर टक्के तत्वावर बसफेऱ्या सुरु झाल्या असून प्रवाशांचा पाहीजे त्या प्रमाणात प्रतीसाद मिळत नसल्याने महामंडळाला आर्थिक फटका बसत आहे. परिणामी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्यांचे दोन दिवस शिल्लक असूनही मागील दोन महिन्यांपासूनचे वेतन अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे ऐन लॉकडाऊनमध्ये कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे.देशात कोरोनामुळे टाळेबंदी करण्यात आली. त्यामुळे आंतरजिल्हा व जिल्हाबाह्य बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. सुमारे सात महिने बसफºया बंद असल्याने महामंडळाला मोठा फटका बसला. त्यामुळे प्राथमिक स्तरावर बसमधून मालवाहतूक सुरु करण्यात आली.त्यानंतर ५० टक्के तत्वावर बससेवा सुरु करण्यात आली. परंतु, त्यालाही प्रवाशांकडून पाहीजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. आता संपूर्ण बससेवा सुरु करण्यात आली आहे. परंतु, महामंडळाला अध्यापही उभारी आली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे.सात महिने वाहतूक बंद असल्याने कर्मचाºयांना टप्पाटप्यात वेतन देण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. थकीत असलेले वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले. मात्र आता जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यांचे वेतन अद्यापही झालेले नाही. दोन दिवसांनंतर सप्टेंबर महिना पूर्ण होणार आहे. तरीसुद्धा वेतन देण्यात आले नसल्याने त्याचे अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळे थकीत वेतन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.जीव धोक्यात घालून बजावताहेत सेवाबसमध्ये अनेक ठिकाणचे प्रवासी प्रवास करीत आहेत. तरीसुद्धा आपला जीव धोक्यात घालून बसचालक, वाहक प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. मात्र त्यांच्या हक्काचे वेतन दोन महिन्यांपासून थकीत राहत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे थकीत वेतन त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.